Ajit Pawar : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यातलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. राजकीय नेत्यांसह समाजिक कार्यकर्त्यांनी या हत्येतील आरोपींचा धनंजय मुंडे यांच्याशी कथित संबंध असल्याचा आरोप करत, मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. तसंच सुरेश धस यांनीही सातत्याने या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. दरम्यान सुरेश धस यांनी बडी मुन्नी असा एक उल्लेख केला होता. त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

धनंजय मुंडेंच्या राजीनामाच्या मागणीवर काय म्हणाले अजित पवार?

पत्रकारांनी त्यांना मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. यावर अजित पवार म्हणाले, “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा विविध तपास यंत्रणा तपास करत आहेत. त्याच्यबरोबर मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, या प्रकरणात कोणी दोषी असल्याचे सिद्ध झाले तर त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. मी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भेटून सांगितले आहे की, पक्ष वगैरे न बघता यामध्ये वरिष्ठ पातळीवर काम करणारे कोणी दोषी असतील तर त्यांची गय करण्याचे कारण नाही. ही क्रूर पद्धतीने झालेली हत्या आहे. अशा प्रकारच्या घटना आम्ही खपवून घेणार नाही.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यानंतर या प्रकरणावर सातत्याने भाष्य करणाऱ्या सुरेश धस यांच्या एका उल्लेखाबाबत विचारलं असता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

हे पण वाचा- Ajit Pawar : शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना ऑफर दिली होती का? अजित पवार स्पष्टच बोलले, “आम्ही…”

सुरेश धस यांनी नेमका काय उल्लेख केला होता?

सुरेश धस यांनी असा उल्लेख केला होता की, राष्ट्रवादीत मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक वरिष्ठ मुन्नी आहे. राष्ट्रवादीत एक बडी मुन्नी आहे आणि त्या मुन्नीला म्हणा तू इथे ये. मिटकरी, सुरज चव्हाण या लहान पोरांना बोलायला लावते. मला माहिती आहे आणि मुन्नीला माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलत आहे. सुरेश धसांच्या या विधानानंतर विविध चर्चा रंगताना दिसल्या. आता सुरेश धस यांच्या या मुन्नीच्या विधानावर अजित पवार हे चांगलेच संतापले.

“मी असल्या फाल्तू…”, काय म्हणाले अजित पवार?

सुरेश धस यांनी बडी मुन्नीचा उल्लेख केला, बडी मुन्नी कोण? असं विचारताच अजित पवार म्हणाले, “बडी मुन्नी कोण हे सुरेश धस यांनाच विचारा. कुणी फाल्तू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणारा आहे. त्यामुळे त्याला (सुरेश धस) विचारा तो कुणाबद्दल बोलतो आहे.” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ajit pawar answer about suresh dhas statement on ncp munni what did ajit pawar say scj