शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ईडी, भाजपा नेते, किरीट सोमय्या यांच्यावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊतांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपाकडून त्यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना सुधीर मुनगंटीवार, प्रसाद लाड, केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलेलं असताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी फक्त एका वाक्यात संजय राऊतांवर खोचक निशाणा साधला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊतांनी पत्रकार परिषद झाल्यानंतर भाजपा नेत्यांकडून ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र, अमृता फडणवीसांनी संजय राऊतांचं थेट नाव न घेता त्यांच्यावर खोचक निशाणा साधला आहे. “आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं असून त्यावर प्रतिक्रिया देखील येऊ लागल्या आहेत.

‘ते’ साडेतीन लोक कोण? राऊत म्हणतात..

दरम्यान, याआधी भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील, असं म्हणणाऱ्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “उद्यापासून तुम्हाला कळेल. कुणी अर्था आहे, कुणा पाव आहे, कुणा चाराणेवाला आहे. हे जसजसे अटक होतील, तसतसे तुम्हाला समजतील”.

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“माझ्या ५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय”

“मी म्हटलं सरकार पडू देणार नाही, तेव्हा माझ्या मागे लागले. त्यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत. माझ्या बँकेत ईडीची लोकं गेल्याचं मला समजलं. माझे २० वर्षांचे बँकेचे स्टेटमेंट घेऊन गेले. माझं गाव अलिबाग. माझी जमीन अलिबागलाच असेल. ते मॉरिशसला नसेल. भाजपाच्या नेत्यांप्रमाणे लंडन-अमेरिकेत माझ्या मालमत्ता नसतील. ५० गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय. त्यासाठी किहीम गावातल्या नातेवाईकांच्या घरी पहाटे ४ वाजता जाऊन त्यांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयात नेऊन ठेवायचं. तू संजय राऊतांच्या विरोधात साक्ष दे की त्यांनी तुला किती पैसे दिले. धमक्या द्यायचं काम ईडी करत आहे. कोणत्या कायद्यानं?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“मुलीच्या लग्नासाठीच्या मेहंदीवाल्याकडे जाऊनही ईडीनं चौकशी केली”, संजय राऊतांचा निशाणा; म्हणाले, “२०२४ नंतर…”

“२०२४नंतर बघू काय होतंय ते”

“५५ गुंठे जमिनीचा तपास ईडी करतंय? किती मोठं काम आहे ईडीकडे? सगळ्यांच नोटिंग झालं आहे ते कोण आहेत ते.. बघू २०२४नंतर काय होतंय ते”, असा इशाराच राऊतांनी दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta fadnavis mocks sanjay raut press conference targeting bjp ed inquiry pmw