सिद्धार्थ शुक्लाने त्याच्या चाहत्यांना ईद निमित्ताने एक धमाकेदार भेट दिली आहे. त्याच्या आगामी ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ या वेबसिरीजचा टिझर नुकताच रिलीज करण्यात आलाय. हा टिझर पाहता यंदाच्या सीजनमध्ये रोमान्स आणि ड्रामा एकत्र पहायला मिळणार असं दिसतंय.
आतापर्यंत ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सीजन १ आणि सीजन २ या वेबसिरीजना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. या दोन्ही सीजनची लव्ह स्टोरी आणि गाण्यांना प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला होता. आता येणाऱ्या ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ सीजन ३ मध्ये नवी कहाणी आणि नवी स्टारकास्ट देखील पहायला मिळणार आहेत.
सिद्धार्थ शुक्लाच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली
‘बिग बॉस’ नंतर सिद्धार्थ शुक्लाचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे. त्याच्यासोबत सोनिया राठी या सीजनमधून डेब्यू करणार आहे. प्रेक्षक वेबसिरीजच्या नव्या सीजनच्या टिझरची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. इतकंच नव्हे तर अक्षरशः प्रेक्षकवर्ग ट्विटरवर या नव्या सीजनच्या टिझरची मागणी करताना दिसून आले. यात #SidharthShukla हा हॅशटॅग देखील ट्रेंड करत होता.
पहा कसा आहे टिझर ?
ऑल्ट बालाजीच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवर हा टिझर शेअर करण्यात आलाय. यासोबतच त्यांनी एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात त्यांनी लिहिलंय, “जिद्द कधी संपत नाही…ती फक्त रूपांतरीत होते….रूमी आणि अगस्त्यची कहाणी सुद्धा अशीच आहे…कधी कधी तुम्हाला जसं हवं असतं तसं होतंच असं नाही….”
या वेबसिरीजमध्ये दोघांमध्ये केमिस्ट्री पासून ते हार्ट ब्रेकींग सीन दाखवण्यात आले आहेत. यापुर्वी मेकर्सनी सोनिया राठी उर्फ रूमी देसाई हीचा पोस्टर रिलीज केला होता. या शोमध्ये रूमी देसाई एका उद्योगपतीची मुलगी दाखवण्यात आलीय. ती एका नाटकातून डेब्यू करताना दाखवली आहे आणि अगस्त्य या नाटकाचं दिग्दर्शन करत असलेला दाखवण्यात आलं आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’ ही वेबसिरीज २० मे २०२१ रोजी ऑल्ट बालाजीवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.