central minister narayan rane allegation aaditya thackeray over disha salian murder case ssa 97 | Loksatta

“दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले…

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात केंद्रातील भाजपाला लक्ष केलं. बिल्किस बानो आणि अंकिता भंडारी प्रकरणांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी पत्रकार परिषद […]

“दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं…”, नारायण राणेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले…
आदित्य ठाकरे नारायण राणे ( संग्रहित छायाचित्र )

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी बुधवारी झालेल्या दसरा मेळाव्यात केंद्रातील भाजपाला लक्ष केलं. बिल्किस बानो आणि अंकिता भंडारी प्रकरणांचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावरून आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पलटवार करत शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.

दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिले. यावेळी नारायण राणेंनी दिशा सालियान खून प्रकरणात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दिशा सालियानचा खून झाला. तिच्यावर अत्याचार करून खून झाला. का त्या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. कोण मंत्री होता? का वाचवण्यात आलं? सचिन वाझेंना पोलीस खात्यात आणून त्या मंत्र्याला वाचवलं,” असे नारायण राणेंनी म्हटलं.

हेही वाचा – दसरा मेळाव्यावर पहिली प्रतिक्रिया देताना नारायण राणे संतापून म्हणाले, “राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर उद्धव ठाकरे…”

“सत्ता तुमची नाही आहे…”

“लोक चर्चा करतात आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणात होते. सचिन वाझेंनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अशी पाप करायला मुख्यमंत्री झाला होता का?, आता उत्तराखंड केसबद्दल बोलता. चुकीच झालं असेल कारवाई होईल, आम्ही लपवणार नाही. मात्र, दिशा सालियान, सुशांत सिंह राजपूतबाबत केल्यालं पाप विसरता येणार नाही. आता तुमची सत्ता नाही आहे, त्यामुळे त्यातील आरोपी पकडले जाणार,” असा इशाराही नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“…आता तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी ‘हिंदुत्वासाठी गेलो’ अशा थापा मारण बंद करावं”

संबंधित बातम्या

संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट
“महिलांनी कपडे घातले नसले तरी…” त्या विधानानंतर बाबा रामदेव यांची माफी
राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
‘महापुरुषांची बदनामी करु नका’, राज ठाकरेंनी ठणकावल्यानंतर फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “कोणीही…”
मुलाच्या विवाह सोहळ्यात दिसली जयंत पाटील यांची राजकीय शक्ती; प्रतीक पाटील यांच्यासाठी तयारी सुरू

व्हिडिओ

ताज्या बातम्या
आफताबवर तलवारीने हल्ला का केला? हिंदू सेनेचा कार्यकर्ता म्हणाला, “आम्ही त्याला फाडून…”
भारतातील प्रसिद्ध रुग्णालय AIIMSचा सर्व्हर हॅक; हॅकर्सनी मागितली २०० कोटींची खंडणी
करण जोहरच्या आगामी चित्रपटात झळकणार काजोल? ‘या’ स्टारकीडच्या आईची भूमिका साकारणार
शेतकऱ्याचा नादच खुळा! शेतात आलेल्या सिंहिंणींना दिलं जशाच तसं उत्तर, Viral Video पाहून म्हणाल ‘कमाल है’
सुपरस्टार चिरंजीवी यांनी चित्रपट महोत्सवात चाहत्यांना दिलं मोठं वचन; म्हणाले “मी चित्रपटसृष्टी…”