वाई : सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे थेट वंशज उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा मावळातील सरदारांचे थेट वंशजांनी साताऱ्यात येऊन त्यांनी उदयनराजेंना पाठिंबा देऊन प्रचारात सक्रिय झाले आहेत.

स्वराज्य निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सातारा राजधानीत रायरेश्वरावर जाऊन स्वराज्याची शपथ घेतली. ही शपथ घेतानाच बारा मावळ मधील बारा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर होते आणि याच बारा मावळच्या सरदारांनी छत्रपतींचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा सरदारांचे थेट वंशज उदयनराजेंच्या समर्थनार्थ साताऱ्यामध्ये येऊन उदयनराजेंना पाठिंबा दिला आहे.

आणखी वाचा-मुस्लिमांचे लाड करणारी काँग्रेस इतिहास बनेल – योगी आदित्यनाथ

आज बारा सरदार वंशजांनी आज साताऱ्यात उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. सर्वांनी उदयनराजांना निवडणुकीत यश मिळावे म्हणून त्यांना पाठिंबा दर्शवत प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवत असल्याचे सांगितले. स्वराज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार आहेत ते ऋण फेडण्याची नामी संधी आली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण यावेळी ‘मान गादीला आणि मतही गादीला’ असं स्लोगन घेऊन प्रचारामध्ये सक्रिय झालो आहोत असे यावेळी सरदार वंशजांनी सांगितले. बारा मावळा तर्फे ऐतिहासिक सरदार घराण्यातील रवींद्र कंक, बाळासाहेब सणस, अमोल सणस, गोरख देशमुख, अनिकेत बांदल, इंद्रजीत जेधे, संदीप पोतनीस, चंद्रशेखर बर्गे, मारुती गोळे आदींनी उपस्थित राहून पाठींबा दिला.