सांगली : प्रशासकांच्या हाती महापालिकेची सुत्रे जाताच तपासणीवेळी ९ कामचुकार कर्मचारी आढळले असून या सर्व कर्मचाऱ्यांना सोमवारी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. महापालिकेत लोकनियुक्त सदस्यांची मुदत १९ ऑगस्ट रोजी समाप्त झाली. यानंतर शासकीय कामकाज सोमवारी सुरू झाले. लोकप्रतिनिधींचा वावर आजपासून थांबल्याने निर्धास्त झालेल्या कर्मचार्‍यांनी दांडी मारण्याचे प्रकार समोर आले. या कामचुकार कर्मचार्‍यांची झाडाझडती घेण्याचे निर्देश आयुक्त सुनील पवार यांनी दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : महायुतीला धक्का? महादेव जानकरांचा ‘एकला चलो रे’चा नारा; म्हणाले, “भीक मागून…”

उपायुक्त राहूल रोकडे यांनी महापालिकेतील बांधकाम, आरोग्य, नगररचना, विद्युत, राष्ट्रीय नागरी उपजिविका, गुंठेवारी कक्ष, आस्थापना आदी विभागात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी काही कर्मचार्‍यांनी हजेरी पत्रकावर स्वाक्षरी ठोकून पळ काढला होता, तर काहींनी रजेचे अर्ज कारकूनाकडे दिले होते.

मात्र, हे रजेचे अर्ज विभाग प्रमुखाकडे पोहच करण्यात आले नव्हते. तर काही कर्मचारी विलंबाने कार्यालयात येत असल्याचे निदर्शनास आले. या मुळे अशा कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येत असल्याचे उपायुक्त रोकडे यांनी सांगितले. कार्यालयीन कामाला शिस्त लावली जाईल, कामचुकार कर्मचार्‍यांवर यापुढे कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commissioner issue show cause notice to indiscipline employees for remain absent in office in sangli css