करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकार सर्वोपतरी प्रयत्न करत असून शाळा, महाविद्यालयं बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज्यातील सर्व महत्त्वाची देवस्थानंदेखील दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. करोनाची लागण होऊ नये यासाठी लोकांना सॅनिटायजर, मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. धुळ्यात तर नागरिकांनी चक्क हनुमानाच्या मुर्तीला मास्क घातलं आहे. हनुमानाच्या मुर्तीला मास्क घालण्यात आलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे मंदिर धुळे कृषी महाविद्यालयाजवळ आहे. धुळ्यात सुदैवाने करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र नागरिकांकडून पूर्वकाळजी घेतली जात असून देवाकडेही साकडं घातलं जात आहे. यामुळेच नागरिकांनी हनुमान मंदिरात जाऊन मुर्तीला मास्क घालत सर्वांचं रक्षण करण्यासाठी साकडं घातलं.

दरम्यान करोनाचा वाढता फैलाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी अनेक मोठी मंदिरं बंद कऱण्यात आली आहेत. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी, पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर, शिर्डीचं साई मंदिर यासह राज्यातील सर्व मोठी मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत.

कोणती मंदिरं बंद करण्यात आली आहेत ?
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर – पंढरपूर<br /> साई बाबा मंदिर – शिर्डी
सिद्धिविनायक मंदिर मुंबई
गणपती मंदिर – गणपतीपुळे
अंबाबाई मंदिर – कोल्हापूर<br /> तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर
गजानन महाराज मंदिर – शेगाव
खंडोबा मंदिर – जेजुरी
मुंबादेवी मंदिर – मुंबई
एकविरा देवी – कार्ला
महालक्ष्मी मंदिर – सारसबाग
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर – पुणे
प्रभू वैद्यनाथा मंदिर – परळी, बीड
कसबा गणपती – पुणे
दत्त मंदिर – श्री क्षेत्र नृसिंहवाडी

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus hanuman idol with mask in dhule sgy