वाई : चांद्रयान ३ मोहिमेमध्ये साताऱ्यातील जगप्रसिद्ध कूपर उद्योग कंपनीचा क्रॅकशाफ्ट वापरण्यात आलेला, आहे ही गोष्ट सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. यानिमित्त उद्योगपती फारूख कूपर यांचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अभिनंदन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कूपर कंपनीने आजपर्यंत अनेक उपकरणे तयार करून आपल्या कार्याचा डंका जगभर वाजवला आणि यापुढेही याच पद्धतीने कंपनीची वाटचाल अखंडपणे कार्यरत राहील याची खात्री आहे, असे यावेळी खासदार उदयनराजे म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते.

हेही वाचा – मनसेच्या कार्यकर्त्यांवर कारवाई केल्यामुळे राज ठाकरेंचा सरकारला इशारा; म्हणाले, “मीही त्याच पद्धतीचं…”

हेही वाचा – अजित पवार मुख्यमंत्री होणार? छत्रपती संभाजीराजे म्हणाले, “मी चॅलेंज देतो की…”

इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स हे एक इस्रोचे द्रव प्रणोदन प्रणालीतील अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे, ज्यामध्ये शुद्ध हायड्रोजन गॅसची आवश्यकता असते. या हायड्रोजन गॅसचा पुरवठा करत आसलेली मे. आंध्र शुगर्स लिमिटेड, सागगोंडा या कंपनीला सदर हायड्रोजन गॅसच्या उत्पादनासाठी ३ कटिंग- एज स्टॅण्डेड हाय – प्रेशर कॉम्प्रेसरची सहाय्यता लागते. हे ३ कटिंग- एज स्टॅण्डेड हायप्रेशर कॉम्प्रेसर मशीन हे मे. बर्कहार्ट कॉम्प्रेशन इंडिया, पुणे यांनी पुरवठा केला. सदर प्रेशर कॉम्प्रेसर मशीनमध्ये लागणारा क्रॅकशाफ्ट हा साताऱ्यातील कूपर कॉर्पोरेशन प्रा. लि. यांनी पुरविलेला आहे. ही सर्व मोहीम भारताची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोअंतर्गत यशस्वी करण्यात आली. कूपर कंपनीचे सर्व कर्मचारी ज्यांनी हा क्रँकशाफ्ट बनवला त्यांचेही उदयनराजे यांनी अभिनंदन केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crackshaft of satara cooper company on moon through chandrayaan 3 ssb