Premium

साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य; अमळनेरात विसर्जन मिरवणुकीतील प्रकार

अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य करत जयघोष करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

sambhaji bhide godse
साने गुरुजींच्या कर्मभूमीत गोडसे, भिडेंच्या प्रतिमांसह नृत्य

जळगाव : ज्येष्ठ गांधीवादी नेते, स्वातंत्र्यसेनानी साने गुरुजी यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेर शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत काही सार्वजनिक मंडळांकडून महात्मा गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसेंसह संभाजी भिडे यांच्या प्रतिमा हातात घेत नृत्य करत जयघोष करण्यात आल्याचे उघड झाले आहे. मिरवणुका शांततेत पार पडल्या. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमळनेर शहरात गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शहराच्या पानखिडकी परिसरातील जय बजरंग गणेश मंडळाची मध्यवर्ती भागातून निघालेली मिरवणूक बोरी नदीलगतच्या दगडी दरवाजालगत आली. तेथे मिरवणुकीत सामील झालेल्या मंडळाच्या काही कार्यकर्त्यांच्या हातात नथुराम गोडसे, संभाजी भिडे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या प्रतिमा होत्या. ढोल-ताशांसह आवाजाच्या भिंती उभारत संबंधितांच्या प्रतिमा हातात घेऊन कार्यकर्त्यांनी नृत्य केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्यामुळे आणि सतर्कतेमुळे कोणतीही अप्रिय घटना घडली नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dance with images of godse bhide in sane guruji bhumi immersion processions at amalner ysh

First published on: 01-10-2023 at 00:14 IST
Next Story
मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यावरून टोलवाटोलवी; मराठा आरक्षण आणि ओबीसी प्रश्नावरून सरकार कात्रीत