संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचे मूळ नाव मनोहर भिडे असं आहे आणि ते सातारा जिल्ह्यातील सबनीसवाडीचे आहेत. भिडे उच्चशिक्षित आहेत. १९८० च्या दशकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही ते कार्यरत होते. हिंदुत्वाबद्दल अतिशय आग्रही आणि आक्रमक अशी त्यांची भूमिका आहे. त्यांच्या विविध वक्तव्यांमुळे मोठे वाद निर्माण झाल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय त्यांना मानणारा तरुणवर्ग हा मोठ्याप्रमाणात आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेद्वारे त्यांचे कार्य चालते. २०१४ मध्ये रायगडमध्ये त्यांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली होती.
सध्या ते सांगलीत वास्तव्यास आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी विचारसरणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणूनही त्यांच्याकजे पाहिले जाते. नुकतीच त्यांची आणि सुधा मुर्तींची झालेली भेट हा चर्चेचा विषय ठरला होता.Read More
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या माध्यमातून २८ जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर ते शिवनेरी जुन्नर धारातीर्थ गडकोट मोहिमेची सांगता…
भिडे गुरुजी यांना तपास यंत्रणेने निर्दोषत्व बहाल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील, विशेषत: सांगली जिल्ह्यातील नेते पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आरोपांना राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर…