काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रचारसभा आटोपून परतत असताना त्यांच्या कारचा भीषण अपघात झाला. भंडाऱ्याजवळच्या भिलेवाडा गावाजवळ मध्यरात्री ही दुर्घटना घडली असून यात कारचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भंडारा शहरालगतच्या भिलेवाडा गावाजवळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा मंगळवारी भीषण अपघात झाला. नाना पटोले मंगळवारी त्यांची प्रचारसभा आटपून सुकळी या गावी जात असताना मध्यरात्रीच्या सुमारास मागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या धडकेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने मोठी घटना टळली. नाना पटोले हेदेखील थोडक्यात बचावले आहेत. यानंतर काँग्रेसने घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे.

“अपघाताच्या घटनेवरून राजकारण करणे चुकीचे”, बावनकुळेंनी काँग्रेसचे आरोप फेटाळले; म्हणाले, “महाराष्ट्रात घातपात…”

काँग्रेस नेते अतुल लोंढे काय म्हणाले?

विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपाला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का, अशी शंकाही अतुल लोंढेंनी उपस्थित केली आहे. या सगळ्या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नाना पटोलेंशी माझं बोलणं झालं -फडणवीस

“मला वाटत नाही की नानाभाऊ घातपात वगैरे काही म्हणतील. मी स्वतः नाना पटोलेंना फोन केला होता. विचारपूस केली. आम्ही वेगवेगळ्या पक्षात असू. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. वैचारिक सामना हा सातत्याने सुरु असतो. पण नाना पटोले हे आमचे मित्रच आहेत. अपघात झाला आहे आणि त्यांनी मला सांगितलं की मी बचावलो पण अपघात मोठा आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अशी परिस्थिती ना उद्भवली आहे ना उद्भवणार आहे. मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.