नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली.
यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला.
२०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणूक लढली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत केले.