शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोणाचा, यावर आज ( २३ सप्टेंबर ) मुंबईत उच्च न्यायालयात सुनावली झाली. यावेळी उच्च न्यायालयाने आमदार सदा सरवणकर यांनी अर्ज फेटाळून लावला आहे. तर, शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटावर सरशी ठरला आहे. याप्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
“न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार प्रशासन काम करेल. न्यायालयात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने भूमिका मांडली होती. मात्र, न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात येईल. कोणी नियमांचे उल्लंघन करु नये यासाठी गृहविभाग काळजी घेईल,” असे देवेंद्र फडणवीस
हेही वाचा – “चित्त्याचा फोटो काढला, वाघाचा फोटो काढण्यासाठी…”; शिवसेनेच्या वाघिणीचं पंतप्रधान मोदींना आव्हान
“शुभेच्छा आहेत”
उच्च न्यायालयाने दसरा मेळाव्याबाबात शिवसेनेच्या बाजूने निर्णय दिला आहे. त्यानंतर येणाऱ्या अनेक न्यायालयीन लढाई जिंकल्या जातील, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावर ‘शुभेच्छा आहेत’ या दोनच शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला उत्तर दिलं आहे.
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis on mumbai high court permission shivsena dasara melava ssa