“विरोधकांना गजनीची लागण झाली आहे”; पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांनी दिलेल्या पत्रावरून फडणवीसांची टीका

देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलेल्या सातपानी पत्रावरून जोरदार टीका केली आहे.

“विरोधकांना गजनीची लागण झाली आहे”; पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधकांनी दिलेल्या पत्रावरून फडणवीसांची टीका
संग्रहित

राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी दिलेल्या सातपानी पत्रावरून जोरदार टीका केली. या पत्रातील मधले चार पानं हे आम्ही विरोधात असताना दिलेल्या पत्राचेच असून विरोधकांना गजनीची लागण झाली असल्याचे म्हटले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

”राज्याचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे आम्ही विरोधकांना चहापाणाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रीत केले होते. मात्र, त्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तसेच आम्हाल सातपानी पत्र दिले. मात्र, या पत्रातले मधले चार पानं आम्ही विरोधात असताना दिलेल्या पत्राचेच आहेत. हे पत्र देताना विरोधकांना विसर पडला की, ते दीड महिन्यापूर्वी सत्तेत होते. मात्र, आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे मंत्रीमंडळ कार्यरत आहे, त्यावर विरोधकांचाही विशेष विश्वास आहे. कारण जी कामं त्यांनी केली नाहीत, ती सर्व कामं त्यांना आमच्याकडून अपेक्षित आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा – “आता त्यांच्या आमदारांसारखं कुणाला मारायला उठू का?” पत्रकार परिषदेत अजित पवारांचा मिश्किल टोला!

विरोधक आमचं सरकार बेईमानीने आल्याचे म्हणत आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत ज्या लोकांनी एकत्रीत येऊन मतं मागितली होती. असे भाजपा आणि शिवसेना हे दोन पक्ष एकत्र येऊन हे सरकार स्थापन झाले आहे. खरं तर महाविकास आघाडीचे सरकार हे बेईमानीचे सरकार होते. जनमताचा अनादर करून हे सरकार आले होते. तसेच महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही ३२ दिवस खातेवाटप झालेले नव्हते. त्यामुळे या विरोधकांना गजनीची लागणं झाली आहे, असे दिसते, अशी टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा – सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं

आमच्या सरकारची चिंता केल्यापेक्षा त्यांनी विरोधकांच्या एकजुटीची चिंता करावी, महाविकास आघाडी विरोधात गेल्यानंतर तीन पक्षाच्या तीन दिशा बघायला मिळत आहे. विधानपरिषदेच्या विरोधीपक्ष नेत्यावरून त्यांच्यात मतभेद आहेत, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
सत्ता डोक्यात गेल्याचा विरोधकांचा आरोप, शंभुराजे देसाईंचं प्रत्युत्तर, म्हणाले “बाळासाहेब ठाकरे…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी