श्रीवर्धन- अतिवृष्टी आणि पावसाळी हंगामामुळे पर्यटकांनी श्रीवर्धन समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट पहायला मिळाला.

विस्तीर्ण समुद्र किनारा रुपेरी वाळू, नारळ, पोफळीच्या बागा, सोबतीला हरिहरेश्वर आणि दिवेआगर सारखी आदर्श पर्यटन स्थळे यामुळे गेल्या काही वार्षात श्रीवर्धन हे आदर्श पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आले आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. कोकणात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पर्यटकांनी सध्या श्रीवर्धनकडे पाठ फिरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.

एरवी पर्यटकांनी गजबजलेला असणार समुद्र किनारा सध्या ओस पडला आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर तुरळक पर्यटक पहायला मिळत आहेत. त्यामुळे किनाऱ्यावर शुकशुकाट पाहायला मिळतोय, पर्यटक नसल्याने पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट पहायला आहे. व्यवसायिकांनी आपले दुकाने बंद ठेवली आहेत.

श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगर परिसरात प्रामुख्याने पुणे, सातारा येथून मोठ्या प्रमाणात भोर घाट बंद करण्यात आला आहे. अंबेनळी घाटातून असणारी वाहतुकींवर निर्बंध आणले गेले आहेत. याचा परिणाम पर्यटन व्यवसायावर झाल्याचे दिसून येत आहे. श्रीवर्धनकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे.

गेल्या काही वर्षात श्रीवर्धन आदर्श पर्यटन स्थळ म्हणून नावारुपास आले आहे. राज्यभरातील हजारो पर्यटक श्रीवर्धनला येऊ लागले आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणी व्यापक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. समुद्र किनाऱ्याचे सुशोभिकरण पायाभुत सुविधांचा विकास यामुळे हजारो पर्यटकांची पाऊले श्रीवर्धनकडे वळू लागली होती. पण अतिवृष्टी आणि वाहतुक नियमनामुळे श्रीवर्धनला येणाऱ्या पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे मत व्यवसायिकांकडून व्यक्त केले जात आहे.

पावसाळी चार महिने पर्यटन व्यवसायाला मंदी जाणवते. पूर्वी तुरळक प्रमाणात पर्यटक पावसाळी सहलींचे नियोजन करायचे. पण अलीकडच्या काळात हे प्रमाण खूपच कमी झाल आहे. अतिवृष्टी आणि रायगड मधील रस्त्यांवर करण्यात आलेले नियमन यामुळे पर्यटकांनी पावसाळी दिवसात श्रीवर्धन येथे येणे टाळले आहे. – गणेश पोलेकर, पर्यटन व्यवसायिक, श्रीवर्धन.