Ed raids Shivsena Leader Sanjay Raut’s Residence : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी सकाळी ७ वाजता ईडीच्या पथकाने छापा टाकला होता. गेल्या नऊ तासांपासून संजय राऊत यांची चौकशी सुरू होती. अखेर आता ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत हे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप ईडीकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ईडीच्या कारवाईनंतर शिवेसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. तसेच संजय राऊत यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक जमले आहेत. या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Live Updates

Sanjay Raut Latest Marathi News: संजय राऊतांच्या घरावर ईडीचा छापा; अटकेची टांगती तलवार

13:18 (IST) 31 Jul 2022
“मी शिवसेना सोडणार नाही आणि…”, ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचं (ED) पथक रविवारी (३१ जुलै) सकाळी ७ वाजता संजय राऊत यांच्या मुंबई येथील घरी दाखल झालं. दिवसभरात राऊतांची पुन्हा चौकशी होईल. यात त्यांना पत्राचाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारले जातील. याशिवाय घराची झडतीही घेतली जाण्याची शक्यता आहे. ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांनी ट्वीट करत पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी मी शिवसेना सोडणार नाही, असं वक्तव्य केलंय. त्यांचं हे ट्वीट चांगलंच चर्चेत आहे.

सविस्तर बातमी…

12:52 (IST) 31 Jul 2022
भाजपा नेते अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

संजय राऊतांना अटक झाली, तर मुलाखत कोणाला देणार? अशी काळीज सद्या उद्धव ठाकरेंना असल्याचा खोचक टोला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

12:39 (IST) 31 Jul 2022
ईडीच्या कारवाईचा राजकारणाशी काहीही संबंध नाही – केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे

सीबीआय आणि ईडी स्वतंत्रपणे काम करतात. याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

12:37 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला – नवनीत राणा

संजय राऊत यांना अटक होणार आहे. ही कारवाई यापूर्वीच व्हायला पाहिजे होती. उशिरा कारवाई झाली. एका साध्या पत्रकाराकडे एवढे पैसे कुठून आले? अशी प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी दिली आहे. संजय राऊत व उद्धव ठाकरे यांनी पदाचा दुरूपयोग केला आहे. असे त्या म्हणाल्या.

12:06 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवरील ही कारवाई अपेक्षित होतीच – माजी मंत्री छगन भुजबळ

राऊतांवर ही कारवाई अपेक्षित होतीच. एकदा ईडीचा तपास सुरु झाला की त्यांचे ऑफिस, घर चेक करतात. भुजबळ फार्मवर पण किती वेळा धाडी पडतात. मात्र, त्यांना अटक होईल का? त्याबाबत बोलू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिली आहे.

12:02 (IST) 31 Jul 2022
संजय राऊतांवर ईडीची कारवाई सूडबुद्धीने नाही – विनायक मेटे

शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी संजय राऊत यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांच्यावर ईडीची चौकशी होणं ही पहिली वेळ नाही. चौकशीत काहीतरी निष्पन्न झालं असेल त्यामुळे ईडीने पुन्हा चौकशी सुरू केलीय. आता या कारवाईत काय सापडतं त्यावर ईडीमार्फत कारवाई केली जाईल. त्यांच्यावर होत असलेली कारवाई ही सूडबुद्धीने नाही. याआधी देखील त्यांना बोलावलं होतं आता त्याची पुढची पायरी म्हणून ही चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया विनायक मेटे यांनी दिली आहे. ते बीड मध्ये बोलत होते.

11:56 (IST) 31 Jul 2022
संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय – नितेश राणे

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीच्या (ED) पथकाने छापा टाकला. ईडीच्या या कारवाईनंतर भाजपा नेते नितेश राणे यांनी संजय राऊतांना टोला खोचक लगावला आहे. “सगळ्यांची सकाळ खराब करणारे संजय राऊत यांची सकाळ खराब झाल्याचे बघून समाधान मिळतंय”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

सविस्तर बातमी

ईडीच्या छाप्यानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. ‘मी शिवसेना सोडणार नाही’, असं ते म्हणाले. ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत.