"देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली"; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान | eknath shinde minister tanaji sawant says devendra fadnavis criticized for his brahmin caste but he gave reservation to maratha scsg 91 | Loksatta

“देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये मराठा समाजाचं आरक्षण गेल्याचंही ते म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण म्हणून हिणवलं पण त्याच ब्राह्मणानं मराठ्यांची झोळी भरली”; शिंदे गटातील मंत्र्याचं विधान
जाहीर भाषणात शिंदेंच्या मंत्र्याने केलं विधान

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सडकून टीका केली आहे. उस्मानाबादमधील ‘हिंदू गर्वगर्जना’ संवाद यात्रेदरम्यान भाषण करताना सावंत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण असल्याच्या मुद्द्यावरुन त्यांना हिणवण्यात आल्याचा संदर्भ आपल्या भाषणा दिला. मात्र ज्या नेत्याला ‘ब्राह्मण म्हणून हिणवण्यात आलं त्यानेच मराठ्यांची झोळी भरली’ असं विधान सावंत यांनी आपल्या भाषणात केलं.

नक्की वाचा >> मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

मराठा सामाजाचे नेते असणाऱ्या सावंत यांनी उस्मानाबादमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केलेल्या भाषणात मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीला लक्ष्य केलं. “आता बघा हे जे सरकार आलं २०१४ ते २०१९ दरम्यान देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना प्रचंड आरोप केले. त्यांना प्रचंड त्रास देण्याचा प्रयत्न केला. मराठा क्रांती मोर्चा काढला. मग त्यांनी याला मुकामुर्चा म्हणून लिहिलं. मराठ्यांचा अपमान केला. आम्ही गप्प बसलो,” असं सावंत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी त्यांच्या जातीवरुन हिणवलं मात्र त्यांनीच मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याचं विधान सावंत यांनी केलं. “ब्राह्मण म्हणून हिणवलं गेलं त्या माणसाला. अरे पण त्याच ब्राम्हणानं या मराठ्यांची झोळी २०१७-१८ ला भरली. मराठ्यांना आरक्षण दिलं. ते टिकलं. दोन तीन बॅचेस बाहेर आल्या. त्यांना नोकऱ्या मिळाल्या,” असं सावंत म्हणाले.

नक्की पाहा >> ‘हिंदू मराठ्यांच्या मुठी आवळल्या तर…’, ‘सणासुदीच्या काळात…’; ‘पाकिस्तान जिंदाबाद’वरुन राज ठाकरेंचा संताप

मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये आरक्षण गेल्याची आठवण सावंत यांनी करुन दिली. “२०१९ ला जेव्हा तुम्ही लोकांच्या विश्वासघात करुन सत्तेत आला. त्यावेळेस पुढच्या सहा महिन्यातच आमचं आरक्षण गेलं. म्हणजे आम्ही मराठे इतके मूर्ख, इतके वेंधळे की आम्हाला काहीच कळत नाही,” असं म्हणत सावंत यांनी आपल्या भाषणामधून महाविकास आघाडीतील घटक पक्षांना लक्ष्य केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मराठा आरक्षणासंदर्भात शिंदे गटाच्या तानाजी सावंतांचं वादग्रस्त विधान; म्हणाले, “सत्तांतर झाल्यानंतर तुम्हाला आरक्षणाची…”

संबंधित बातम्या

“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
“मी काल पवार साहेबांशीही बोललो, ते म्हणाले…”, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत राज ठाकरेंचं वक्तव्य
“काहीतरी काय? हे बाहेर पडले…”, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला दिलं खोचक प्रत्युत्तर!
शिवराय-एकनाथ शिंदेंच्या तुलनेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले “इमान विकलेल्या…”
Maharashtra Breaking News Live : मंगलप्रभात लोढांविरुद्ध संभाजी ब्रिगेड आक्रमक; वाचा राज्यभरातील घडामोडी एका क्लिकवर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे: आंतरतारकीय हवामानाचा शास्त्रज्ञांकडून वेध
“यामागे काही…” आस्ताद काळेने सांगितले उजव्या दंडावर छत्रपती शिवरायांचा टॅटू काढण्यामागचे खरे कारण
बापरे! सरकारी रुग्णालयात वर्षभरापासून बालरोगतज्ज्ञ म्हणून काम करणारी डॉक्टर निघाली १० वी पास
बिग बींच्या नातीची खवय्येगिरी; रस्त्याच्या कडेला चाट-पापडीचा आस्वाद घेताना दिसली नव्या, फोटो चर्चेत
अपघातानंतर क्रिकेटर ब्रेन डेड, कुटुंबियांनी अवयवदान करत दिलं आठ रुग्णांना नवं आयुष्य