महाराष्ट्रातील मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत सरकारी नोकरी व शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आणि मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाला हिंदू जनजागृती समितीने विरोध दर्शविला आहे. हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी, त्यांच्या संपर्कात असणाऱ्या अनेक मराठा समाजाच्या संघटनांनी अशाप्रकारच्या आरक्षणाची कोणतीही गरज नसल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेकडून नाकारण्यात आलेल्या आघाडी सरकारने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्यांक समाजाला आमिष दाखवण्यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतल्याची टीका शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत केली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jun 2014 रोजी प्रकाशित
हिंदू जनजागृती समितीचा मराठा, मुस्लिम आरक्षणाला विरोध
महाराष्ट्रातील मराठा आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाचा राज्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केला.

First published on: 26-06-2014 at 02:22 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hindu organisation opposes quota for marathas muslims in maha