Sushma Andhare Beaten By Thackeray Group Leader, Viral Video: शिवसेनेत बंडखोरी झाल्यापासून ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात सामील झाले आहेत. बंडखोरी होऊन जवळपास अकरा महिने पूर्ण झाले आहेत. तरीही ठाकरे गटाची गळती थांबत नाहीये. दररोज कोणता ना कोणता नेता शिंदे गटात प्रवेश करत आहे. असं असताना उद्धव ठाकरे यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीयेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता बीडमध्ये ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. येथील ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये तुफान राडा झाला आहे. ठाकरे गटाचे बीडमधील स्थानिक नेते गणेश वरेकर आणि जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांच्यात वाद झाला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यासमोरच या दोन नेत्यात वाद झाला आहे. यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अप्पा जाधव यांनी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या आहेत. याबाबतचा दावा अप्पा जाधव यांनी स्वत: व्हिडीओ शेअर करत केला आहे.

हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी स्वत: मातोश्रीवर पैसे दिले”; शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा खुलासा

संबंधित व्हिडीओत अप्पा जाधव म्हणाले, “सुषमाताई अंधारे सध्या जिल्ह्यामध्ये खूप दादागिरी करत आहेत. आमच्या पदाधिकाऱ्यांकडून त्या पैसे मागत आहेत. आपल्या कार्यलयात एसी, फर्निचर आणि सोफा बसवण्यासाठी त्या पदाधिकाऱ्याकडून पैसे घेत आहेत. त्या माझंही पद विकत आहेत. मी पक्ष वाढवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहे. रक्ताचं पाणी करत आहे. माझ्या लेकरा-बाळाच्या मुखातील पैसे खर्च करून मी पक्ष वाढवत आहे. याकडे सुषमा अंधारेंचं लक्ष नाही. त्यामुळे सुषमा अंधारेंचा आणि माझा वाद झाला. या वादात मी सुषमा अंधारेंना दोन चापट्या लगावल्या.”

सुषमा अंधारेंना मारहाण झाल्याचा VIRAL VIDEO:

नेमकं प्रकरण काय?

खरं तर, सुषमा अंधारे सध्या ‘महाप्रबोधन यात्रे’निमित्त बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा बीडमध्ये होणार आहे. या दरम्यान ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा दावा केला. पण त्यांचा हा आरोप सुषमा अंधारे यांनी फेटाळला आहे. मला कुठलीही मारहाण झाली नसल्याचं सुषमा अंधारे म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I slapped twice to shushma andhare claim by thackeray group leader appa jadhav beed viral video rmm