"...तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा" बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा | If someone calls us betrayer then you should slap them statement by rebel MLA sanjay Bangar rmm 97 | Loksatta

“…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा

जर तुम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं आवाहन संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

“…तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा” बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा धमकीवजा इशारा
बंडखोर आमदार संतोष बांगर (संग्रहीत फोटो)

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात अनेक वेगवान घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उर्वरित अनेक आमदार त्यांच्या गटात सामील झाले आहेत. असं असलं तरी बंडखोर आमदार आम्ही शिवसेनेतच आहोत, असा दावा करत आहेत. अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी बंडखोर आमदारांना ‘गद्दार’ म्हणून हिनवत आहेत. याच मुद्द्यावरून बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मोठं विधान केलं आहे.

जर तुम्हाला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्यांच्या कानाखाली आवाज काढा, असं आवाहन संतोष बांगर यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं आहे. ते हिंगोली येथील एका कार्यक्रमात बोलत होते. दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, “आपण शिवसैनिक आहोत. जर आपल्याला कुणी गद्दार म्हणत असेल तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकांनी करावं. आम्ही भिणारे शिवसैनिक नाहीत. आमच्या हातामध्ये बांगड्या नाहीयेत. आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हटलं तर त्याला कारे नाही, पण कानाखाली आवाज काढल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत, हे ध्यानात ठेवा” असा धमकीवजा इशारा बांगर यांनी दिला आहे.

हेही वाचा- चालू पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी केली एकनाथ शिंदेंच्या कानात कुजबूज, VIDEO व्हायरल

खरंतर, बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला संतोष बांगर हे उद्धव ठाकरे यांच्या गटात होते. बंडखोरी झाल्याची बातमी समजल्यानंतर बांगर यांना अश्रू अनावर झाले होते. त्यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यानंतर सोशल मीडियात ‘निष्ठेचा नांगर, संतोष बांगर’ अशी मोहीम देखील पाहायला मिळाली होती.

हेही वाचा- “बंडखोरांच्या पार्श्वभागावर दांड्याचे फटके मारा” म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील, १५ दिवसांतच घेतला यू-टर्न

पण यानंतर अवघ्या काही दिवसांत संतोष बांगर यांनी आपल्या विधानापासून यू-टर्न घेत शिंदे गटात सामील झाले. शिंदे गटात सामील झाल्यानंतर आता त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून बंडखोर आमदारांना गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढण्याचं आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बदलापुरात शिवसेनेचा सुपडा साफ; सर्वच नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा

संबंधित बातम्या

“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी…”; शिवरायांबद्दल बोलताना अमोल कोल्हेंचा माईक बंद केल्याने NCP चा हल्लाबोल
“फुले-आंबेडकर, कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली”, चंद्रकांत पाटलांचं विधान
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे भावना भडकवत आहेत का? उदयनराजेंनी दिलं उत्तर, म्हणाले “भाजपाने त्यांना…”
Maharashtra News Live : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी राज्यातील सर्व खासदारांची मोदींसमवेत बैठक; वाचा महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!
“…तर माझी मुलगी जिवंत असती”, श्रद्धा वालकरच्या वडिलांचे पोलिसांवर गंभीर आरोप, चौकशीची मागणी

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बायकोच्या मांडीवर डोकं ठेवत अविनाश नारकर यांनी शेअर केला फोटो, लग्नाच्या २७ वर्षानंतरही ऐश्वर्या यांना म्हणतात ‘बब्बू’
Fifa World Cup 2022: संघ बाहेर पडल्यानंतर स्पेनचे प्रशिक्षक एनरिक यांची हकालपट्टी
मुंबई: टॅक्सीचालकांना लुटणारी टोळी अटकेत
मुंबई: ‘मेट्रो ३’ची आरे कारशेड :‘एमएमआरसी’ची ८४ झाडे हटविण्याची प्रक्रिया अडचणीत?
Video: कुशल बद्रिकेची सिंघम स्टाइल एन्ट्री अन् सरु आजीचे डायलॉग ऐकून रणवीर सिंग पोट धरुन हसला, व्हिडीओ व्हायरल