बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतींमधील एका कापड कारखान्याला भीषण आग लागली आहे. आगीची खबर मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तारापूर औद्योगिक वसाहतींमधील प्लॉट क्र. एच – ३/४ वरील अंगदपाल टेक्सटाइल्स या कापड बनविणाऱ्या कारखान्याला संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : सांगली : ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्काजाम आंदोलन

कंपनीत तयार कापड आणि कपडा बनविण्याचा कच्चा माल असल्याने आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. आग लागल्याची खबर मिळताच तारापूर अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी पोचले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. आग लागल्याचे समजताच कंपनीत काम करणारे सर्व कामगार बाहेर पडल्याने आतमध्ये कोणी अडकले असल्याची शक्यता कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In boisar fire breaks out at tarapur industrial area cloth manufacturing factory angadpal textile industry css