सांगली : उसाला पहिला हप्ता प्रतिटन साडेतीन हजार रूपये मिळावा, मागील हंगामातील उसाला ४०० रूपयांप्रमाणे दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे इस्लामपूर-सांगली, गुहागर विजापूर, पलूस-सांगली या प्रमुख मार्गावरील वाहतूक खंडित झाली.

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रतिटन ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळावा या मागणीसाठी गेल्या एक महिन्यापासून संघटनेचे आंदोलन सुरू आहे. मात्र, साखर कारखान्याकडून या मागणीला अद्याप अनुकूलता दर्शवण्यात आलेली नाही. शेतकरी संघटनेने मागील हंगामातील दुसरा हप्ता व चालू हंगामासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन हजार रूपयांची मागणी केली आहे. मात्र, याबाबत कारखानदारांकडून कोणतीच भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. या मागणीसाठी झालेल्या चर्चेच्या दोन फेर्‍या निष्फळ ठरल्याने आज चक्काजाम आंदोलन हाती घेण्यात आले.

1195 minor girls missing from Nagpur in three years
नागपूर : उपराजधानीतून तीन वर्षांत ११९५ अल्पवयीन मुली बेपत्ता
Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

हेही वाचा : पालघरमध्ये शेतकऱ्यांसाठी ड्रोनद्वारे युरिया फवारणीचे प्रात्यक्षिक

इस्लामपूर मार्गावरील लक्ष्मी फाटा येथे, गुहागर विजापूर मार्गावरील पलूस येथे, पलूस मार्गावरील नांद्रे येथे कवठेमहांकाळ मार्गावरील शिरढोण येथे आणि बोरगाव फाटा, तुरची आदी ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने या मार्गावरील सर्व वाहतूक खंडित झाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा : “मराठा अभिमानापेक्षा कुणबी शब्द धारण करून आरक्षण घ्या”, मनोज जरांगेंचं आवाहन

गत हंगामात इथेनॉल विक्रीतून कारखान्यांना चांगला पैसा मिळाला असल्याने यातील ४०० रूपये प्रतिटन देण्याची आमची मागणी असून यंदा साखरेलाही बाजारात चांगला दर असल्याने यंदाच्या हंगामात पहिला हप्ता साडेतीन हजार रूपये मिळावेत या मागणीसाठी आमचे आंदोलन सुरू असून कोणत्याही परिस्थितीत हक्काचे पैसे मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.