नागपूर : समाजात फूट पाडा आणि सत्ता मिळवा, या सूत्रावर काँग्रेस पक्ष चालतो. हिंदूंमध्ये जेवढी फूट पडेल तेवढा त्यांचा फायदा होईल, हे काँग्रेसला माहिती आहे. त्यामुळे हिंदू समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सातत्याने केला जात असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. राज्यातील ७,६४५ कोटींच्या विविध प्रकल्पांचे भूमिपूजन दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर कठोर शब्दांत हल्लाबोल केला.
हेही वाचा : उमेदवारांच्या भाऊगर्दीचे हरियाणा प्रारूप महाराष्ट्रातही?
काँग्रेस बेजबाबदार पक्ष असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. हा पक्ष देशात फूट पाडण्यासाठी नवनवीन ‘नरेटिव्ह’ तयार करीत असतो. मुस्लिमांना भीती दाखवा, त्यांचे ‘व्होटबँके’मध्ये रूपांतरित करा व आपली मतपेढी भक्कम करा हे काँग्रेसचे सूत्र आहे. हरियाणातील विजयाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, की काँग्रेसने शेतकऱ्यांना भडकावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या उत्पादनांना हमीभाव कुणी (पान ८ वर) (पान १ वरून) दिला, हे त्यांना माहिती आहे. युवकांना वेगवेगळ्या पद्धतीने भडकावण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला. मात्र युवकांनी भाजपवरच विश्वास ठेवला. हरियाणाच्या निकालामुळे देशाचा ‘मूड’ कळला आहे. काँग्रेसची पूर्ण इकोसिस्टम, शहरी नक्षलवादी टोळी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत होती. मात्र, काँग्रेसचे षड्यंत्र उद्ध्वस्त झाले. दलितांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. मात्र हरियाणातील दलित समाजाने भाजपला समर्थन दिले आणि ओबीसीही भाजपबरोबर आहेत, असा दावा मोदी यांनी केला.