रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पालकांनी आरटीई च्या मोफत शिक्षण संकल्पनेकडे पाठ फिरवले असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरटीईच्या एकूण ७९७ रिक्त जागांपैकी आतापर्यंत ५४० प्रवेश निश्चीत झाले आहेत. रत्नागिरी तालुक्यात १२६ जागा तर जिल्ह्यात एकूण २५७ जागा अद्याप रिक्त आहेत.
रत्नागिरी तालुकानिहाय आरटीई पात्र स्कूल, रिक्त जागा आणि प्राप्त अर्ज शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या आरटीई प्रवेशाच्या एकूण असलेल्या ७९७ रिक्त जागांपैकी तिसऱ्या फेरीअखेर ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चीत झाले आहेत. तर रत्नागिरी तालुक्यातील १२६ विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली असल्याने जिल्ह्यात एकूण २५७ जागांवरील प्रवेश शिल्लक राहिले आहेत.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षण देण्यात येते. यासाठी खासगी मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातात. शिक्षण विभागाकडून राज्यस्तरावर ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पहीलीपासून आरटीई प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात तिसऱ्या फेरी पर्यत एकूण ५४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत. अजूनही या प्रवेशाच्या एकूण २५७ जागा शिल्लक राहिल्या आहेत.
तालुका | प्रवेश | रिक्त जागा |
चिपळूण | ११३ | ७१ |
दापोली | ५० | १९ |
गुहागर | २० | ०२ |
खेड | १२१ | ६२ |
लांजा | ०८ | १३ |
मंडणगड | २० | ०३ |
राजापूर | ०७ | २० |
रत्नागिरी | १८० | १२६ |
संगमेश्वर | २१ | १८ |