राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. एकनाथ शिंदे यांनी मागील सहा महिन्यांत उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं, अशी टीका आव्हाडांनी केली. आव्हाडांच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी प्रत्युत्तर दिलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले, “जितेंद्र आव्हाड केवळ प्रसिद्धीत राहण्यासाठी अशी विधानं करतात. त्यांचं सध्या जे काही सुरू आहे, त्यांनी जे काही केलं आहे, ते आता भोगायला लागणार आहे. त्यामुळे त्याचं खापर कुणावर फोडायचं? यासाठी ते मुख्यमंत्र्यांवर टीका करतात. मुख्यमंत्र्यांविरोधात बोललं तरच प्रसिद्धी मिळेल, असं त्यांना वाटतं, त्यामुळे आव्हाड मुख्यमंत्र्यांविरोधात बोलतात.”

हेही वाचा- पुणे : रोहित माझ्या मुलासारखा, त्याच्याबाबत मी असे करूच शकत नाही ; अजित पवार यांची स्पष्टोक्ती

“पण जितेंद्र आव्हाड नेमके आहेत तरी कोण? आम्ही महाविकास आघाडीत असतानाही जाहीरपणे त्यांच्याशी आघाडी करायची नाही, असं म्हणत होतो. त्यामुळे त्यांच्या पाठीत खंजी खुपसण्याचा प्रश्नच येत नाही, ” अशी प्रतिक्रिया नरेश म्हस्के यांनी दिली. दरम्यान, त्यांनी जितेंद्र आव्हाडांबद्दल गौप्यस्फोट केला. जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांचे फोटो जाळण्यासाठी आम्हाला फोन केला होता, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला.

हेही वाचा- रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी लावली ‘फिल्डिंग’? शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले?

ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नरेश म्हस्के म्हणाले, “ज्या दिवशी अजित पवारांनी सकाळचा शपथविधी घेतला. त्यावेळी ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष, जितेंद्र आव्हाड आणि इतर अनेक नगरसेवकांनी अजित पवारांच्या प्रतिमेला काळं फासलं होतं. अजित पवारांविरोधात घोषणा दिल्या होत्या. त्यांना गद्दार म्हटलं होतं. त्यांचे पुतळे जाळले होते.”

हेही वाचा- “म्हस्केंना एकच सांगतो…”, अजित पवारांवरील ‘त्या’ गौप्यस्फोटावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

“त्यावेळी जितेंद्र आव्हाडांनी आम्हाला फोन केले होते, की अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतळे जाळा. त्यांच्या प्रतिमेला काळं फासा. मला स्वत:ला फोन आला होता. मग त्याला गद्दारी म्हणायची की खुद्दारी म्हणायची? जितेंद्र आव्हाडांनी ठाण्यात जे काही केलं, ते गद्दारांच्या विरोधात होतं की खुद्दारांच्या विरोधात होतं?” असा सवाल नरेश म्हस्के यांनी विचारला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jitendra awhad called us to torch ajit pawar photo naresh mhaske claim rmm
Show comments