शिंदे गटाचे नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

नरेश म्हस्के यांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. नरेश म्हस्के यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाही. त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न करू नये, असा टोला रोहित पवारांनी लगावला. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

MP Sanjay Singh says it is time to say goodbye to BJP
खासदार संजयसिंग म्हणतात, ‘भाजपला निरोप देण्याची वेळ’
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
Rohit Pawar Post Against Raj Thackeray
“तंबाखूच्या पुडीवर ‘आरोग्यास हानिकारक’ असं..”, राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यावर रोहित पवारांची पोस्ट
Rajinder Pal Kaur
“भाजपात सहभागी होण्यासाठी ५ कोटींची ऑफर”, आप आमदाराची पोलिसात तक्रार; गुन्हा दाखल

हेही वाचा- पुणे : रोहित माझ्या मुलासारखा, त्याच्याबाबत मी असे करूच शकत नाही ; अजित पवार यांची स्पष्टोक्ती

नरेश म्हस्के यांच्या दाव्याबाबत विचारलं असता रोहित पवार म्हणाले, “नरेश म्हस्के यांना मी कधीही भेटलो नाही. मी त्यांच्याबद्दल कधी काही ऐकलं नाही. फक्त एकच गोष्ट ऐकली आहे, त्यांना जेव्हा ठाण्याचा नगराध्यक्ष बनायचं होतं. त्यावेळी आज ते ज्या पार्टीत आहेत, त्या पार्टीतील नेत्यांनी त्यांना विरोध केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगून त्यांना (नरेश म्हस्के) नगराध्यक्ष केलं. आज ते ज्या पार्टीत आहेत, त्या पार्टीतील नेत्यांना विरोध करण्यासाठी नरेश म्हस्के काँग्रेसमध्येही जाणार होते. आता त्याच विरोध करणाऱ्या नेत्यांची ते बाजू घेत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे.”

हेही वाचा-रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवारांनी लावली ‘फिल्डिंग’? शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट

रोहित पवार पुढे म्हणाले, “नरेश म्हस्के आज अजित पवार आणि जितेंद्र आव्हाडांवर बोलले. ते अनेक नेत्यांवर बोलले आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे. त्यामुळे तो माझा विषय राहत नाही. पण नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहावी आणि त्यानंतर विधानं करावीत. म्हस्केंना एकच सांगतो, त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाही, त्यामुळे त्यांनी तसा प्रयत्न करू नये.”

नरेश म्हस्के यांनी नेमका दावा काय केला?

अजित पवारांवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले, “क्रिकेट कन्ट्रोल बोर्डाची निवडणूक होती. या निवडणुकीत रोहित पवार उमेदवार म्हणून उभे होते. आपण माहिती काढा, पवार कुटुंबातील कुठली व्यक्ती ‘रोहित पवारांना पाडा’ म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. अजित पवार, तुम्ही आधी आपलं बघा. आपलं घरातलं बघा. नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी आपण कुणाकुणाला फोन केले होते? कुणाला निरोप दिले होते? हे आधी सांगा. त्यानंतर आमच्यावर टीका करा.”