पाली-वाकण पुलाजवळ रस्त्याला मोठमोठे तडे गेले आहेत. महिन्याभरातच या रस्त्याची दुर्दशा झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे.

वाकण ते खोपोली मार्ग महामार्ग म्हणून घोषित झाला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा कडून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीलाच या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. मात्र पावसात या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याला पाली पुलाजवळ भेगा पडल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे.

हेही वाचा… …तर कदाचित इर्शाळवाडीतील अनेकांचा जीव वाचला असता

हेही वाचा… चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदियासह राज्यातील काही जिल्ह्यांना आज “रेड अलर्ट”

त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.