महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामधील सर्वात लोकप्रिय विभागांपैकी एक असलेल्या कोकणाला (Konkan) स्वर्गाची उपमा दिली जाते. सह्याद्री पर्वतरांगा आणि अरबी समुद्र यांच्यामध्ये असणाऱ्या भूमीला कोकण असे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीला ७२० कि.मी. (४५० मैल) लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
कोकण विभागामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड ,रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ठाणे आणि पालघर या सात जिल्ह्यांचा समावेश होतो. बेलापूर येथे कोकण भवन आहे. अपार नैसर्गिक सौदर्यांने नटलेल्या या प्रदेशामध्ये आंबे, नारळ, काजू, फणस, सुपारी अशा गोष्टी पाहायला मिळतात. समुद्रातील मासे, नारळ आणि तांदूळ हे कोकणातील जेवणामध्ये हमखास आढळते. भगवान परशुरामाने कोकणाची निर्मिती केली असे म्हटले जाते. कोकणामध्ये स्वराज्याची राजधानी रायगडासह अनेक किल्ले अस्तित्त्वात आहेत.
या विभागामध्ये मालवणी, कोंकणी अशा काही भाषा बोलल्या जातात. अलिबाग, श्रीवर्धन, वेंगुर्ला, गुहागर, हरिहरेश्वर यांसारथी बरीचशी पर्यटनस्थळे कोकणामध्ये आहेत. Read More
Maharashtra loses oil refineries project: राज्यात सत्तास्थापनेची गडबड सुरू असताना कोकणातील तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेशमध्ये हलविण्याची शक्यता…
लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही कोकणात महायुतीने निर्विवाद वर्चस्व कायम राखले. १५ पैकी १४ जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीला जोरदार धक्का…