कोल्हापूर : वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आलेला नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीच्या मागणीसाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली आहे. केवळ ४८ तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. हे सर्व अर्ज भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी लक्ष घालून हत्ती परत येण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे.

दरम्यान या वेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी नांदणी मठातील महादेवी हत्ती परत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आश्वासन देण्याऐवजी ती किती दिवसात परत येणार, हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान शनिवारी दिले. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, दत्त कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, राहुल खंजिरे , शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, शशिकांत खोत व कार्यकर्ते उपस्थित होते.

नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान जैन मठातील महादेवी हत्ती वनतारा पशुसंवर्धन केंद्रात नेण्यात आला. आमदार सतेज पाटील यांनी याला जोरदार विरोध केला असून, त्यांनी महादेवीला पुन्हा कोल्हापुरात आणण्यासाठी स्वाक्षरींची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत केवळ ४८ तासांत तब्बल सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

नांदणी मठात स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते या फॉर्मचे पूजन झाल्यानंतर आज आमदार पाटील यांच्या हस्ते येथील पोस्ट कार्यालयामध्ये हे सर्व अर्ज भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना पाठवण्यात आले. राष्ट्रपतींनी लक्ष घालून हत्ती परत येण्यासाठी हस्तक्षेप करावा, अशी मागणी पाटील यांनी केली. दरम्यान या वेळी बोलताना पाटील यांनी नांदणी मठातील महादेवी हत्ती परत आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आश्वासन देण्याऐवजी ती किती दिवसात परत येणार, हे ठोसपणे जनतेसमोर जाहीर करावे, असे आव्हान दिले.

वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापुरात आल्याची कल्पना विरोधी आमदारांना दिली गेली नसल्याने यावर पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, दत्त कारखान्याचे संचालक गणपतराव पाटील, राहुल खंजिरे , शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर प्रकाश पाटील, माजी नगरसेवक राजेश लाटकर, शशिकांत खोत व कार्यकर्ते उपस्थित होते.