कराड : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीला वन विभागाने गुजरातमधील वनतारा येथील आश्रयस्थानी हलविल्यानंतर ती पुन्हा नांदणी मठात परत आणावी, या मागणीसाठी कराड शहरात भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली शिवतीर्थ दत्त चौक येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.
दुचाकी रॅलीत ट्रॅक्टरवर महादेवी हत्तीची प्रतीकात्मक प्रतिकृती ठेवण्यात आली होती. विविध सामाजिक संघटना, नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीचा मार्ग दत्त चौक, आझाद चौक, चावडी चौक, कन्याशाळा, कृष्णा नाका, विजय दिवस चौक असा होता. नागरिकांच्या ‘महादेवी परत आणा’ या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला.
महादेवी हत्तीचा वापर कथितपणे मिरवणुकांमध्ये केल्याचा आरोप प्राणी कल्याण संस्थेने (पेटा) केल्यानंतर, ही बाब न्यायालयात गेली. त्यानंतर समितीच्या शिफारशींवर आधारित न्यायालयीन निर्णयानुसार या हत्तीला वनतारामध्ये हलविण्यात आले. मात्र, गेल्या तीन दशकांपासून नांदणी मठाशी आणि कोल्हापूरकरांशी जोडलेले महादेवी हत्तीचे जिव्हाळ्याचे नातेही नागरिकांच्या भावना दुखावणारे ठरले आहे.
या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह कराड, सांगली, सातारा परिसरात स्वाक्षरी मोहिमा, जनजागृती आणि आंदोलनात्मक कार्यक्रम राबवले जात आहेत. कराडमधील ही रॅली त्याच मोहिमेचा एक भाग होती.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीला वन विभागाने गुजरातमधील वनतारा येथील आश्रयस्थानी हलविल्यानंतर सर्वदूर त्याच्या प्रतिक्रिया उमटत असताना, विशेषतः सातारा जिल्ह्यात त्याची तीव्रता अधिक जाणवली. महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात परत आणावी, या मागणीसाठी कराड शहरात भव्य मोटरसायकल रॅलीच्या करण्यात आलेल्या आयोजनात अनेक सेवाभावी व सामाजिक संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी मोठ्या उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले होते.
ही रॅली शिवतीर्थ दत्त चौक येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. या वेळी कराडकरांच्या भावना अतिशय तीव्र होत्या. सर्वजण महादेवी हत्तीला पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात कधी, कसे आणता येईल या विवंचनेत दिसत होता. जागो- जागी फलक लावून महादेवी हत्ती परत कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठात आणली जावी अशी मागणी करताना त्यावर आपल्या आपुलकी, जिव्हाळाही व्यक्त होता. या दुचाकी रॅलीत ट्रॅक्टरवर ठेवलेली महादेवी हत्तीची प्रतीकात्मक प्रतिकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.