महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा विधिमंडळ परिसरात संपन्न झाला. एकूण ३६ आमदारांना राज्यपालांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासह २६ आमदारांनी कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळं वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार दिवसांच्या सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं होतं.

मंत्रिमंडळात तीन महिला मंत्री
उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात फक्त तीन महिला आमदारांना संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर आणि आदिती तटकरे यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेटमंत्रिपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीनं आदिती तटकरे यांच्याकडे राज्यमंत्रिपद सोपावलं आहे. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपद दिलं नाही.

Live Blog

Highlights

    14:27 (IST)30 Dec 2019
    यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

    अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई, सतेज उर्फ बंटी पाटील, दत्तात्रय भरणे, बच्चू कडू, विश्वजित कदम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते. 

    14:10 (IST)30 Dec 2019
    अब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ

    मराठवाड्यातील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

    14:10 (IST)30 Dec 2019
    अब्दुल सत्तार यांनी घेतली शपथ

    मराठवाड्यातील शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली

    14:09 (IST)30 Dec 2019
    उदय सामंत आणि अनिल परब यांनीही घेतली शपथ

    शिवसेना नेते उदय सामंत आणि अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

    14:06 (IST)30 Dec 2019
    आदित्य ठाकरे यांनी घेतली शपथ

    आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पद आणि गोपनीयेतीची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    14:04 (IST)30 Dec 2019
    असलम शेख यांनी घेतली शपथ

    मुंबईतील काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ. २००४ ते २००९ काँग्रेसकडून नगरसेवक होते. सध्या ते मालाड प. आमदार आहेत.

    14:04 (IST)30 Dec 2019
    शंकरराव गडाख यांनी घेतली शपथ

    २००९ मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार म्हणून निवडून आले. २०१९ मध्ये नेवासा मधून अपक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेला पाठींबा दिला होता. शंकरराव गडाख यांना शिवेसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयेतेची शपथ दिली.

    13:59 (IST)30 Dec 2019
    के. सी पाडवी यांच्या शपथविधीनंतर राज्यपालांनी केली नाराजी व्यक्त

    काँग्रेसचे नेते के. सी पाडवी यांनी शपथविधीनंतर मनोगत व्यक्त केल्यानंतर राज्यपाल चांगलेच भडकले. राज्यपाल यांनी पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली.

    13:58 (IST)30 Dec 2019
    के. सी पाडवी यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कार्यकरणीचे सदस्य आहेत. त्यांनी सलग सात वेळा आमदार होण्याचा पराक्रम केला आहे.१९९५ पासून अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार आहेत.

    13:55 (IST)30 Dec 2019
    अशोक चव्हाणांसह मराठवाड्याला सहा मंत्रिपद

    काँग्रेसने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर राष्ट्रवादीनं अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणार असून, अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.

    13:53 (IST)30 Dec 2019
    बाळासाहेब पाटलांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ.

    13:49 (IST)30 Dec 2019
    यशोमती ठाकूप यांनी घेतली शपथ

    काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्र काँग्रेस कार्याध्यक्षा म्हणून सध्या काम पाहत आहेत. २०१९ ला तिसऱ्यांदा आमदार म्हणून त्या निवडून आल्या आहेत.

    13:47 (IST)30 Dec 2019
    संदिपान भुमरे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    शिवसेना आमदार संदिपान भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. पंचायत समितीपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरूवात झाली.ग्रामीण भागाशी घट्ट नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या पक्षसंघटनेत त्यांचा सिंघाचा वाटा आहे.

    13:45 (IST)30 Dec 2019
    जितेंद्र आव्हाड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित

    13:41 (IST)30 Dec 2019
    अमित देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. यावेळी त्यांचे बंधू रितेश देशमुख यांनी उपस्थिती दर्शवली होती. २००२ ते २००८ पर्यंत अमित देशमुख यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषावलं आहे.

    13:37 (IST)30 Dec 2019
    जळगावमध्ये शिवसेने दिली दोन कॅबिनेट मंत्रिपदे

    जळगावमधील शिवसेनेचे दिग्गज नेते गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. गुलाबराव पाटील वयाच्या २५ व्या वर्षीपासून राजकारणात सक्रीय आहेत. जळगाव मतदार संघातून चार वेळा आमदार झाले आहेत.

    13:35 (IST)30 Dec 2019
    संजय राठोड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    जळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. सलग १८ वर्ष संजय राठोड यांनी जळगाव जिल्हाचे अध्यक्षपद भूषावलं आहे.२०१४ मध्ये राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

    13:32 (IST)30 Dec 2019
    विदर्भातील सुनिल केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    काँग्रेसचे विदर्भातील आमदार सुनिल केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शपथ दिली. १९९५ पासून सावनेर मधून सुनिल केदार सलग आमदार म्हणून निवडून आले आहेत.

    13:29 (IST)30 Dec 2019
    राजेश टोपे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

    राजेश टोपे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. २००१ मध्ये त्यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली होती. २०१२ साली  त्यांनी उर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली होती. १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले

    13:27 (IST)30 Dec 2019
    वर्षा गायकवाड यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गायकवाड यांना शपथ दिली.

    13:26 (IST)30 Dec 2019
    नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ

    राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, हसन मुश्रीफ आणि डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    13:20 (IST)30 Dec 2019
    अनिल देशमुख यांना घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

    काँग्रेसचे विदर्भातील आमदार अनिल देशमुख यांना राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

    13:17 (IST)30 Dec 2019
    विजय वडेट्टीवार यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ

    काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. विजय वडेट्टीवार यांची १९८० पासून राजकीय कारकीर्द सुरू आहे.

    13:12 (IST)30 Dec 2019
    धनंजय मुंडे यांच्याकडेही कॅबिनेट मंत्री पदाची जबाबदारी

    परळी मतदारसंघातून निवडून आलेले धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाले आहेत.  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते

    13:10 (IST)30 Dec 2019
    दिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्री पदाची शपथ

    दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

    13:07 (IST)30 Dec 2019
    अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

    माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली शपथ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित

    13:03 (IST)30 Dec 2019
    अजित पवार पुन्हा आले, घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

    अजित पवार यांनी तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार बारामतीमधून सहा वेळा आमदार म्हणून निवडणून आले आहेत. 

    12:57 (IST)30 Dec 2019
    थोड्याच वेळात होणार शपथविधी

    ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. मंत्रीमंडळ विस्ताराला अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे.   

    12:24 (IST)30 Dec 2019
    आज शपथ घेणारे कॅबिनेट मंत्री
    • उपमुख्यमंत्री - अजित पवार

    कॅबिनेट मंत्री

    1. अशोक चव्हाण
    2. दिलीप वळसे पाटील
    3. धनंजय मुंडे
    4. विजय वडेट्टीवार
    5. अनिल देशमुख
    6. हसन मुश्रीफ
    7. वर्षा गायकवाड
    8. डॉ. राजेंद्र शिंगाणे
    9. नवाब मलिक
    10. राजेश टोपे
    11. सुनिल केदार
    12. संजय राठोड
    13. गुलाबराव पाटील
    14. अमित देशमुख
    15. दादा भुसे
    16. जितेंद्र आव्हाड
    17. संदिपान भुमरे
    18. बाळासाहेब पाटील
    19. यशोमती ठाकूर
    20. अनिल परब
    21.  उदय सामंत
    22.  के.सी. पाडवी
    23. शंकरराव गडाख
    24. असलम शेख
    25. आदित्य ठाकरे
    12:23 (IST)30 Dec 2019
    हे राज्यमंत्री आज घेणार शपथ

    • अब्दुल सत्तार
    • सतेज उर्फ बंटी पाटील
    • शंभुराजे देसाई
    • बच्चू कडू
    • विश्वजीत कदम
    • दत्तात्रय भारणे
    • आदिती तटकरे
    • संजय बनसोडे
    • प्राजक्त तनपुरे
    • राजेंद्र पाटील येड्रावकर
    12:18 (IST)30 Dec 2019
    हे आमदार घेणार मंत्रिपदाची शपथ
    12:12 (IST)30 Dec 2019
    आदित्य ठाकरेही होणार कॅबिनेट मंत्री; ‘हे’ खातं मिळणार?
    11:49 (IST)30 Dec 2019
    अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंकडेही कॅबिनेट मंत्रिपद

    अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर आदित्य ठाकरे यांच्याकडेही कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शपथ घेणाऱ्या ३६ आमदारांची यादी राजभवनाकडून जाहीर करण्यात आली आहे.  

    11:25 (IST)30 Dec 2019
    आदित्य ठाकरेही घेणार मंत्रिपदाची शपथ

    आदित्य ठाकरेही आज, सोमवारी मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शिवसेनेचे मुंबईतील नगरसेवक समाधान सरवनकर यांनी ट्विट करत आदित्य ठाकरे यांना मंत्रीपदी वर्णी लागल्याबद्दल अभिनंदन करणारे ट्विट केलं आहे.हे सरकार आहे युवा सरकार युवा आमदार आदित्य ठाकरे यांची मंत्री पदी निवड झाल्या बद्दल अभिनंदन @AUThackeray धन्यवाद उद्धवसाहेब तरुणांचं प्रतिनिधित्व आता महाराष्ट्र मंत्रिमंडळात— Samadhan Sarvankar (@samadhan234) December 30, 2019

    11:03 (IST)30 Dec 2019
    शपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी शरद पवारांचे घेतले आशिर्वाद

    मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी धनंजय मुंडे यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशिर्वाद घेतले. 

    10:44 (IST)30 Dec 2019
    भावाचं नाव वगळल्यानं मंत्रिमंडळ विस्तारावर खासदार संजय राऊत नाराज?
    10:35 (IST)30 Dec 2019
    शपथ घेण्यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते पवारांच्या भेटीला

    आज, सोमवारी दुपारी एक वाजाता होणाऱ्या शपथविधी कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यासह इतर नेते सिल्व्हर ओक येथे पोहचले आहेत.

    10:30 (IST)30 Dec 2019
    मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूराला भोपळा?

    सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सोलापूर जिल्ह्याला भोपळा मिळाला असल्याचे चित्र आहे. सोलापूरातून राष्ट्रवादीकडून बबन शिंदे आणि भारत भालके यांची नावे चर्चेत होती. काँग्रेसकडून प्रणिती शिंदे यांचं नाव आघाडीवर होतं. मात्र, अंतिम यादीमध्ये प्रणिती शिंदे यांचं नाव नाही. शिवसेनेने माजी मंत्री तानाजी सावंत यांचाही पत्ता कट केल्याची चर्चा आहे.  

    09:14 (IST)30 Dec 2019
    अजित पवारांकडे उपमुख्यमंत्रीपद?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून समोर आलेल्या कॅबिनेट मंत्र्यांच्या यादीत अजित पावर यांचं नाव अग्रस्थानी आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पदाची जबाबदारी येण्याची दाट शक्यता आहे.

    09:02 (IST)30 Dec 2019
    घटक पक्ष नाराज