महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एएनआयच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत.

शिवसेनेचे कोकणातील प्रमुख नेते असलेल्या उदय सामंत यांनी शनिवारी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद असल्याने शंका उपस्थित झाली होती. मात्र आता ते गुवाहाटीला पोहचल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे गटात आणखी एका शिवसेना आमदाराचा समावेश झाला आहे.

दरम्यान, एकीकडे उद्धव ठाकरे हे भावनिक आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत पक्षातल्या पदाधिकाऱ्यांची भेट आणि मेळावे घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे याही बंडखोर आमदारांच्या पत्नींना फोन करुन समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र उदय सामंत यांच्या रुपाने शिवसेनेतील ही गळती सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra minister of higher technical education uday samant joins eknath shinde faction at guwahati abn