Maharashtra Monsoon Weather Updates in Marathi : महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती तयार झाली आहे. यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. संततधार पावसामुळे अनेक ठिकाणं जलमय झालीत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत. या ठिकाणांहून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी देखील पोहचवण्यात येत आहे. राज्यातील पावसासह इतर सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी आढावा…

Live Updates

Maharashtra Live Updates 12 July 2022 : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट

11:58 (IST) 12 Jul 2022
धरणक्षेत्रांत हंगामातील विक्रमी पाऊस, खडकवासला धरणातून ३४२४ क्युसेकने विसर्ग

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात यंदाच्या हंगामातील विक्रमी पाऊस पडला. त्यामुळे खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या धरणातून मुठा नदीत सोमवारी रात्री ११.३० पासून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजल्यापासून खडकवासला धरणातून नदीपात्रात ३४२४ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्राच्या परिसरातील नागरिकांवर सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सविस्तर बातमी…

11:50 (IST) 12 Jul 2022
मागील ३ तासांत मुंबईत पावसाच्या जोरदार सरी, भायखळ्यात ६७ मिमी पाऊस

के. एस. होसाळीकर म्हणाले, “सकाळी ११.३० वाजेपर्यंत मागील ३ तासांत मुंबईत पावसाच्या काही जोरदार सरी पडल्या आहेत. मध्य मुंबईकडे अधिक पाऊस आहे. भायखळ्यात गेल्या ३ तासांत ६७ मिमी पाऊस झाला. दिवसभर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.”

11:48 (IST) 12 Jul 2022
पुण्यात मागील २४ तासात किती पाऊस? वाचा…

पुण्यात मागील २४ तासात किती पाऊस? वाचा…

महाराष्ट्र Live Update

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पूरग्रस्त भागाचा आढावा घेऊन उपाययोजना केल्या जात आहेत.