Live Marathi News Updates, 24 June 2025 : मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणीही आज पार पडते आहे. यातली एक जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकली आहे अशीही बातमी समोर आली आहे. तर पहिलीपासून जो हिंदी विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता त्यााबाबत राज्य सरकारने तूर्तास एक पाऊल मागे घेतलं आहे. याबाबत राज ठाकरेही बोलण्याची शक्यता आहे. तर उदय सामंत यांनी भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदेंचं नेतृत्व स्वीकारा म्हणत थेट ऑफर दिली आहे. या आणि अशा सगळ्या बातम्यांवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra Breaking News Highlights मुंबईत पावसाच्या सरी, लोकल वाहतुकीचा वेग मंदावला; यासह महत्त्वाच्या घडामोडी

11:23 (IST) 24 Jun 2025

रतन टाटांच्या मृत्युपत्रात उल्लेख नसलेल्या समभागांचे काय ? उच्च न्यायालयाने दिला महत्वाचा निर्णय

दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मालकीच्या सूचीबद्ध आणि सूचीबद्ध नसलेल्या दोन्ही समभागांचा त्यांच्या मृत्युपत्रात उल्लेख नाही. …सविस्तर वाचा
11:19 (IST) 24 Jun 2025

माघी गणेशोत्सवातील मूर्तींचे अद्यापही विसर्जन नाही, तीन मंडळांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा

माघी गणेशोत्सवाला तब्बल सहा महिने झाले तरी पश्चिम उपनगरातील तीन मंडळांच्या गणेशमूर्तींचे अद्याप विसर्जन झालेले नाही. …अधिक वाचा
11:06 (IST) 24 Jun 2025

मुंबईत दोन पिस्तुलांसह तरूणाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

जोगेश्वरी परिसरात एक संशयीत शस्त्रांसह येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष-१० च्या पोलिसांना मिळाली होती. …सविस्तर बातमी
10:57 (IST) 24 Jun 2025

मुंबई ते जॉर्डन थेट विमानसेवा

जाॅर्डन येथे पेट्रा हे प्राचीन शहर, मृत समुद्र व इतर अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. …वाचा सविस्तर
10:52 (IST) 24 Jun 2025

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत पहिला विजय अजित पवारांचा

बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झाले आहेत. अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकीत ‘श्री नीळकंठेश्वर पॅनेल’ने खाते उघडले असून, आणखी सहा गटांच्या निकालाची उत्सुकता असणार आहे.

बारामतीतील प्रशासकीय भवनामध्ये सकाळी नऊ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात ‘ब’ गटाची मतमोजणी सुरू झाली. या गटात मुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. या गटासाठी ९९ टक्के मतदान झाले होते. १०२ मतदारांपैकी १०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता. त्यापैकी अजित पवार यांना ९१ मते मिळाली. भाजपचे नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या ‘सहकार बचाव शेतकरी पॅनेल’चे उमेदवार भालचंद्र देवकाते यांना अवघी दहा मते मिळाली. अजित पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने उमेदवार उभा केला नव्हता. त्यामुळे अजित पवार यांनी सहजपणे विजय मिळविला.

10:49 (IST) 24 Jun 2025

बदलापूर : जून महिन्यातच बारवी धरण निम्म्यावर, गेल्या वर्षाच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा

यंदाच्या वर्षात पावसाने ऐन उन्हाळ्यात बरसण्यास सुरुवात केली. मे महिन्याच्या पूर्वर्धात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. …अधिक वाचा

मुंबई पाऊस ताज्या बातम्या लाईव्ह अपडेट्स

मुंबईत आज सकाळपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेचा खोळंबा झाला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक १५ ते २० मिनिटं उशिराने सुरु आहे. तर माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीची मतमोजणीही आज पार पडते आहे. यातली एक जागा अजित पवारांच्या पॅनलने जिंकली आहे अशीही बातमी समोर आली आहे