Mumbai Maharashtra Weather Update Live : लाडकी बहीण योजनेसाठी महायुती सरकारने सामाजिक न्याय विभाग व आदिवासी कल्याण विभागाचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वळवल्याचा दावा केला जात आहे. यावरून आरोप प्रत्यारोप चालू आहेत. तर, मुळशीतील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणाचे अपडेट्स आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी शशांक हगवणे, लता हगवणे व करिश्मा हगवणे या तिघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, वैष्णवीच्या पालकांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी वकील आर. आर. कावेडिया यांची नेमणूक करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूला सुशली हगवणे व शशांक हगवणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्रपरवाने मिळवल्याचं प्रकरण समोर आलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणाविषयीचे प्रत्येक नवे अपडेट्स तुम्हाला या न्यूज ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

दरम्यान, गोकुळ दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षनिवडीसाठी आज कोल्हापुरात महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीवरही आपलं लक्ष असेल. तर, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या अर्जांची पडताळणी करताना २,६५२ लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यांचे अर्ज बाद केले जातील. तसेच आणखी सहा लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी केली जाईल. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होतील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढू असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Live Updates

Latest Maharashtra News Highlights : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एकाच क्लिकवर.

10:14 (IST) 30 May 2025

“मला चौंडीत येण्यापासून रोखलं अन् दोन महिन्यात त्यांच सरकार पडलं”, पडळकरांचा मविआला टोला

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवारी (२९ मे) चौंडी येथे प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मी भूतकाळावर बोलत नाही. मात्र, महाविकास आघाडीने जे केलं ते त्याचं प्रायश्चित्त भोगत आहेत. ३१ मे रोजी त्यांनी मला चौंडीत येण्यापासून रोखलं आणि जुलै महिन्यात त्यांचं सरकार पडलं.