Maharashtra Politics Updates : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर २०२५) ७५ वा वाढदिवस असून या निमित्ताने देशासह जगभरातून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्यातील नेत्यांकडून देखील पंतप्रधान मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. याबरोबरच राज्यातील राजकारणात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. काल मुंबईत भाजपाच्या विजय संकल्प मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. पुढील दोन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

Mumbai Pune Marathi News Live Today : राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…..

12:08 (IST) 17 Sep 2025

कांदा निर्यातीवर मिळणार अनुदान; किती अनुदान मिळणार, केंद्र सरकारच्या निर्णयाचा फायदा कुणाला ?

कांदा दरात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यापुढे जाणीपूर्वक दर पाडणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करून, त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल. …वाचा सविस्तर
12:06 (IST) 17 Sep 2025

खुषखबर: पुण्यात पाच दिवस ‘या’ ठिकाणी मोफत चित्रपट पहावयास मिळणार…

मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ चे आयोजन देशभरातील १०५ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहेत …सविस्तर बातमी
11:31 (IST) 17 Sep 2025

खुषखबर: पुण्यात पाच दिवस ‘या’ ठिकाणी मोफत चित्रपट पहावयास मिळणार…

मुंबा फिल्म फाऊंडेशनतर्फे २४ ते २८ सप्टेंबर या कालावधीत पुण्यात सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे’ चे आयोजन देशभरातील १०५ चित्रपट मोफत दाखविण्यात येणार आहेत …अधिक वाचा
11:16 (IST) 17 Sep 2025

मिरा भाईंदरच्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी तीनशे कोटींचा खर्च, एमएमआरडीएकडून प्रस्ताव तयार

मिरा-भाईंदर शहराच्या मुख्य रस्त्यावरील काशिमीरा ते गोल्डन नेस्ट मार्ग सिमेंट काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास तीनशे कोटींचा खर्च अपेक्षित केला आहे. …सविस्तर वाचा
10:57 (IST) 17 Sep 2025

मुख्यमंत्र्याच्या भाषणा दरम्यान काळे कापड फडकावून, निषेधाच्या घोषणा

मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर ओबीसी आंदोलकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या भाषणा दरम्यान काळे कापड फडकावून सरकारच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. …वाचा सविस्तर
10:43 (IST) 17 Sep 2025

जळगावात शेतीप्रश्नी विरोधक एकत्र… महायुतीच्या अडचणीत वाढ !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागल्यापासून महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. …सविस्तर वाचा
10:25 (IST) 17 Sep 2025

तीन टप्प्यांत निवडणुकांमुळे राज्यात दोन-तीन महिने आचारसंहिता ? 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आणखी दोन ते अडीच लाख ईव्हीएम यंत्रे उपलब्ध झाल्यास निवडणूक व आचारसंहितेचा कालावधी कमी करता येणे शक्य होणार आहे.  …सविस्तर बातमी
10:25 (IST) 17 Sep 2025

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकालगत नवा अवैध कबुतरखाना; कबुतरांसाठी राजरोसपणे खाद्य विक्री सुरू

रेल्वे स्थानकातून प्रवास करणारे अनेक प्रवासी, व्यापारी दररोज कबुतरांना राजरोसपणे खाद्य टाकत असल्याने येथे कबुतरांची संख्या वाढू लागली आहे …अधिक वाचा
10:14 (IST) 17 Sep 2025

Maharashtra Local Body Polls : जिल्हा परिषदा, नगरपालिका शेवटी महानगरपालिकांचे बिगूल वाजणार 

सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने तीन टप्प्यांमध्ये या निवडणुका घेण्याची तयारी केली आहे. …सविस्तर वाचा
10:10 (IST) 17 Sep 2025

राज्यातला सामाजिक तणाव सरकार पुरस्कृत आहे का? रोहित पवारांचा संतप्त सवाल

“आज राज्यात अतिवृष्टीने ओला दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकरी पूर्णतः उध्वस्त झाला आहे तर बेरोजगारीचा प्रश्न चव्हाट्यावर येऊन राज्यातला युवा बेहाल झाला आहे.…परंतु सरकार मात्र याकडे लक्ष न देता जाती-जातीत भांडणं लावून मूळ मुद्यावरून लक्ष विचलित करू पाहत आहे. वेगवेगळ्या सामाजिक आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते रस्त्यावर उतरत आहेत पण हेच नेते सरकारमध्ये वेगवेगळ्या पदांवर असूनही सरकारकडे पाठपुरावा करत नसतील तर याचा अर्थ काय घ्यायचा? राज्यातला सामाजिक तणाव सरकार पुरस्कृत आहे असा अर्थ घ्यायचा का? केवळ सत्तेत बसून आणि सामाजिक नेतृत्व घेऊन प्रश्न पेटवत ठेवणे आणि समाजा-समाजात फूट पाडणे योग्य नाही तर प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचं आहे. केंद्र तसेच राज्यात एखादी सत्ता असूनही पाठपुरावा होणार नसेल, सामाजिक प्रश्न सुटणार नसतील अशा एकहाती सत्ता असलेल्या सरकारचं काय लोणचं घालायचं का? सर्वच जातीचे शेतकरी आज अतिवृष्टीने उध्वस्त झाले आहेत, सर्वच जातीचे युवा आज बेरोजगारीच्या झळा सोसत आहेत, सरकारने कालच्या मंत्रिमंडळात बैठकीत यावर निर्णय घेऊन आज मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मदत पॅकेज जाहीर करायला हवं होतं, जाहिरातीपेक्षा या पद्धतीच्या शुभेच्छा अधिक योग्य राहिल्या असत्या…… “, अशी पोस्ट रोहित पवारांनी केली आहे.

09:18 (IST) 17 Sep 2025

राज ठाकरेंचं पहलगाम हल्ल्याबाबत व्यंगचित्र; भारत-पाक क्रिकेट सामन्यावर केलं मार्मिक भाष्य

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक व्यंगचित्र पोस्ट केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातील संबंध बिघडलेले असतानाही भारतीय क्रिकेट संघाने काही दिवसांपूर्वी आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरोधात क्रिकेट सामना खेळाला. यावरून त्यांनी गृह मंत्रालय आणि आयसीसीवर भाष्य केले आहे.