Maharashtra Latest News Updates : मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या खासदारांची ते भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचंही कळतं आहे. तसंच सर्व जागा लढवण्याच्या तयारीत राहा असंही त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यभरात पावसाने ओढ दिली आहे. काही भागांमध्ये तुरळक पाऊस पडतो आहे. या आणि अशा सगळ्याच घडामोडींवर आपली नजर असणार आहे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून

Live Updates

Maharashtra Live News : दादरमधल्या कबूतरखाना परिसरात जैन बांधवांचं आंदोलन, पोलिसांचा फौजफाटा तैनात, यासह महत्त्वाच्या बातम्या

12:16 (IST) 6 Aug 2025

मुख्यमंत्री निधीचा वापर त्याच्या उद्देशासाठीच करा, उच्च न्यायालयाचे आदेश

मुख्यमंत्री निधीचा वापर केवळ आणि केवळ नैसर्गिक आपत्ती आणि तत्सम घटनेतील पीडितांना मदत करण्यासाठी केला जायला हवा. …अधिक वाचा
12:05 (IST) 6 Aug 2025

मुंबई : कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या अडीचशे जणांवर कारवाई, महिनाभरात १ लाख २४ हजारांचा दंड वसूल

कबुतरांची पिसे व त्यांच्या विष्ठेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने मुंबईतील कबुतरखान्यांवर महानगरपालिका प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येत आहे. …अधिक वाचा
11:49 (IST) 6 Aug 2025

विहिरीत हातपाय बांधलेला मृतदेह आढळला, मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील घटना

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील एका विहिरीत हातपाय बांधलेला ४८ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून, घटनेचा तपासा सुरू केला आहे. विहिरीतील मृतदेह हा धानोरा येथील घनश्याम भुतडा राहणार खामगाव यांचा असल्याचे समोर आले असून, हातपाय बांधलेल्या अवस्थेत मृतदेह होता. त्यामुळे पोलिसांना घातपाताची शंका बळावली असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. तर मृतकाच्या नातेवाईकांनी सुद्धा घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली आहे.

11:46 (IST) 6 Aug 2025

फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाने बनावट कॉल सेंटर, शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक

गोरेगाव पश्चिमेच्या राम मंदिर येथील अस्मी कॉम्प्लेक्स मधील एका कार्यालयात फॉरेक्स ट्रेडींग करणारे एक बनावट कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती गोरेगाव पोलिसांना मिळाली होती. …सविस्तर वाचा
11:40 (IST) 6 Aug 2025

देशातील मत्स्योत्पादन घटले मात्र, राज्यातील वाढले… सविस्तर वाचा, असं नेमकं का झालं?

पश्चिम बंगालने ३५ टक्के, तमिळनाडूने २० टक्के तर ओडिशाने १८ टक्के इतकी वाढ नोंदवली आहे. …सविस्तर बातमी

मुंबईतल्या दादर या ठिकाणी कबूतर खाना परिसरात जैन समाजाने आंदोलन सुरु केलं आहे. या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे आज आणि उद्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. महाविकास आघाडीच्या आणि शिवसेनेच्या खासदारांची ते भेट घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने तयारीला लागा अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याचंही कळतं आहे.

दादरच्या कबुतर खान्यावर पालिकेची कारवाई, अतिरिक्त बांधकाम हटवले (छायाचित्र सौजन्य – लोकसत्ता टीम)