Latest Marathi News Highlights Updates : नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेखोरांकडून वसूल करण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, या हिंसाचाराचा मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर आज बुलडोझर चालवण्यात येणार आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली गेली. तर, दुसरीकडे कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्याचीही जोरदार चर्चा असून याप्रकरणी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. यासह राज्यातील इतर घडामोडी पाहुयात.
Maharashtra News Highlights Today, 24 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा
‘छावा’ टिपेश्वरमध्ये करतोय धूम ! झलक पाहण्यासाठी पर्यटक उतावीळ
टिपेश्वर अभयारण्यात शनिवारी सायंकाळी सफारीसाठी आलेल्या अनेक पर्यटकांना आर्ची, छावा आणि वीर या वाघांची ‘सायटिंग’ झाली.
भरधाव ट्रॅव्हल्स दुभाजकावर धडकली… कोल्हापूर- नागपूर बसचे ३५ प्रवासी…
अपघात इतका भीषण होता की, चालक हा बसच्या समोरचा काच फोडून बाहेर फेकला गेला. तर बसच्या वाहनाचे इंजिन तुटून थेट प्रवासी दरवाजाजवळ येउन धडकले.
VIDEO : “मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी रुग्णवाहिका थांबवण्यात आली”, पुण्यातील आमदाराचा गंभीर आरोप
चंद्रपूर : वाघीण आधी जेरबंद, नंतर मात्र जंगलात…
उत्तर ब्रह्मपुरी वनक्षेत्राच्या सीमेवरील गावांमध्ये वाघांची उपस्थिती ही एक सामान्य घटना आहे. वाघांच्या डरकाळ्या त्यांच्यासाठी नित्याच्या झाल्या आहेत.
वाघाच्या हल्ल्यात माणसांचे मृत्यू वाढले… उपाययोजनांसाठी आता थेट मुख्यमंत्र्यांनीच…
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वाघांच्या हल्ल्यातील नागरिकांच्या जिवीतहानीची गंभीर दखल घेतली आहे.
शेतमालाचे भाव मात्र पडलेलेच, सालगड्यांचा पगार एक लाख ४१ हजारावर
शेतमालाचे भाव पडलेले असताना शेतात काम करणाऱ्या सालगड्यांचा पगार एक लाख २५ हजाराहून एक लाख ४० हजारांवर गेला आहे.
फहिम खानने यशोधरानगर ठाण्याच्या हद्दीतील संजय बाग कॉलनी येथील दोन मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम केले आहे. ते पाडण्याचे काम सुरू झाले आहे.
धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करत असाल तर सावधान..! जागतिक क्षयरोग दिन विशेष
फुफ्फुसांच्या जळजळीमुळे छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे, अत्याधिक थकवा आणि अशक्तपणा, ज्यामुळे दैनंदिन कामांवर परिणाम होतो.
सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुलेंना भारतरत्न मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे करणार शिफारस, अजित पवारांची माहिती
दोन्ही सभागृहाचा आमदार होण्याचा बहुमान, मिळाले तेराच महिने आणि म्हणतात…
राजकीय आयुष्य निवडले की एखादे तरी पद पदरात पडले पाहिजे, अशी मनिषा राजकीय कार्यकर्ता बाळगून असतो.
गडचिरोली : जिल्ह्यातील नदीपात्र कोरडे, शेतकऱ्यांवर रानटी हत्तीचे दुहेरी संकट; सहपालकमंत्री क्रिकेटमध्ये व्यस्त, काँग्रेसच्या…
गडचिरोली अतिदुर्गम व मागास जिल्हा असून जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे.
किशोरी पेडणेकर यांच्या एका सूचक ट्वीटमुळे ते पक्षाला रामराम ठोकणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “चर्चांना उधाण येण्याची गरज नव्हती. ज्या पद्धतीने प्रवृत्ती वाढताना दिसत आहेत, ज्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून लढलो, त्या सर्वांना तिकडे जाऊनही शांतता लाभत नाही, इथे राहिलेल्यांना कसं अडचणीत आणता येईल, याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणून मी ते ट्वीट केलं. त्यामुळे आता आम्ही जे ओळखलंय ते परफेक्ट ओळखलं आहे, असं माझं म्हणणं आहे. मी ज्या पक्षात आहे त्या पक्षात ठाम आहे. मानसन्मान आम्हाला आमच्या पक्षात मिळतो. जो मानसन्मान तुम्हालाही मिळत होता, प्रत्येकवेळेला स्वतःची सरशी करण्याकरता आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्यावर मी बोलले.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) March 23, 2025
“नागपूरच्या दंगलीची ठिणगी दोन्हीबाजूने पडली होती, सर्वधर्माच्या…”, संजय राऊतांचा थेट प्रश्न
दंगल दोन्ही बाजूने घडली, दंगलीची ठिणगी दोन्ही बाजूने पडली. हे लक्षात घेतलं तर सरकार एकतर्फी कारवाई करत आहे. दंगलखोरांवर कारवाई झाली पाहिजे, पण दंगलीची सुरुवात ज्यांनी केली ते तुमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा कोणी काढला? चिथावणी तुमच्या सहकाऱ्यांनीच दिली आहे. त्यानंतर लोकांना चालना मिळाली. तुम्ही समान नागरी कायदा म्हणताय ना. मग सर्वप्रकारच्या, सर्वपक्षाच्या, सर्वधर्माच्या दंगलखोलांवर एकपद्धतीची कारवाई होणं गरजेचं आहे. काल ज्यांनी दंगल केली, त्यांच्याही घरावर बुलडोझर फिरले पाहिजेत.
राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत सहमत
अख्खी विधानसभा खोक्याने भरलेलं आहे या विधानाशी मी असहमत आहे. पण ते म्हणतात तसं, विधिमंडळात खोकेभाई भरलेले आहेत, हे विधान गांभीर्याने घेतलं पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणावर बोट ठेवलं आहे. असे खोकेभाई राजकारणात असल्याने ते सहज निवडून येतात. त्यांना भूमिका नाही, मत नाही, हे सर्व खोके एकत्र आले आणि निवडून येऊन सत्तेवर बसले आहेत – संजय राऊत</p>
“संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधलाय”, संजय राऊतांची टीका
महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे. कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय व्यंगात्मक टीका टीप्पणी करत असतो. त्याने आमच्यावरही टीका केलेली आहे. कालच्या पॉडकास्टमध्ये तो ठाणे की रिक्षा असं काहीतरी म्हणतोय. यामध्ये कोणाला अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडण्याची काय गरज आहे. ५०-६० लोक जातात, हातात लाठ्याकाठ्या घेतात आणि स्टुडिओ उद्ध्वस्त करतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहखातं सोडावं, कारण त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही, किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीय. बीड,नागपूरला काय झालं? आज राज्याच्या राजधानी एका पॉडकास्टरला स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय झोपा काढत होते? – संजय राऊत</p>
नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंड फहीम खानच्या घरावर बुलडोझर
VIDEO | Maharashtra: Civic authorities demolish the illegal portions of a house of Fahim Khan, a key accused in the Nagpur violence who has been booked for sedition, after he failed to remove the unauthorised structure.#NagpurViolence #NagpurNews
— Press Trust of India (@PTI_News) March 24, 2025
(Full video available on PTI… pic.twitter.com/mpqox3MQ1L
Maharashtra News Highlights Today, 24 March 2025 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचा