Mumbai- Pune Rain Updates : नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास अखेर राजस्थानमधून सुरू झाल्याचे भारतीय हवामान विभागाने रविवारी जाहीर केले आहे. यानंतर मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई शहरात पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आणि जनजीवन विस्कळीत झाले. दरम्यान येत्या काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या कालावधीत मेघगर्जनेसह पाऊस पडेल.

Live Updates

Mumbai Rain Update : राज्यातील पावसासंबंधीत आणि इतरही सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

09:14 (IST) 15 Sep 2025
मुंबईत पुढील ३ तास ‘रेड अलर्ट’; मुंबईत पुढील ३ तास ‘रेड अलर्ट’; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

भारत हवामान खात्याकडून मुंबई महानगर प्रदेशात पुढील ३ तासांसाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’चा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, अशी माहिती मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आली आहे.

09:02 (IST) 15 Sep 2025

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Mumbai Heavy Rainfall : दरम्यान, पुढील काही तासांत मुंबईत पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. …सविस्तर वाचा
09:01 (IST) 15 Sep 2025

मुंबईत मुसळधार पाऊसाची हजेरी; ऐन गर्दीच्या वेळेत वाहतूक मंदावली

मुंबई शहरात आज सकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाचा परिणाम वाहतूकीवर झाल्याचे पाहायला मिळाले. शहर आणि उपनगरातील सखल भागात पाणी साचल्याने ऑफिसला पोहचण्याच्या घाईच्या वेळेत वाहतूक मंदावल्याने नागरिकांना अडचणीचा समाना करावा लागला.