राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या परळी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली. या सभेची वातावरण निर्मिती करण्याबरोबर पंकजा यांनी मोदीसमोर शक्तीप्रदर्शन केलं. यासाठी सभेची जाहिरातबाजी करण्यात आली होती. पण, जाहिरातींमधून भाजपाला तळागाळात पोहोचवणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडे यांचाच फोटो वगळण्यात आला होता. ही बाब निदर्शनास आणून देत, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
आणखी वाचा : स्ट्राँगरूम आणि मतमोजणी केंद्राजवळचे मोबाइल टॉवर बंद करा; धनंजय मुंडेंची मागणी
दिवंगत लोकनेत्यांचा अपमान कसं करायचा हे भाजपला चांगलंच जमतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी बीड येथील जाहीर सभेमध्ये भाजपावर टीकास्त्र सोडलं.
महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ विडा येथे लोकांशी संवाद साधला. आज मोदींच्या सभांसाठी छापलेल्या जाहिरातीत स्व. गोपीनाथ मुंडे साहेब यांचा साधा फोटोसुद्धा नव्हता. मोदींनी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. pic.twitter.com/onqCzDhcUd
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 17, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या आधी गोपीनाथ गडाकडेही पाठ फिरवली. माझ्या जीवनातील हा सर्वात वाईट दिवस होता. या विधानसभेची निवडणूक ही इमानदारी विरुद्ध बेईमानीची आहे. सर्व कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेब यांच्या संगनमताने नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी दिल्यानंतरही त्यांनी पक्षांतर केले. याला म्हणतात बेईमानी, या बेईमानीला केजच्या मातीत गाडा, अशी भावना यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : “सभेत शेतकऱ्यांनी कर्जमाफीचं विचारल्यावर फडणवीसांकडून ‘भारत माता की जय’च्या घोषणा”
परळीमध्ये मोदी काय म्हणाले?
“भाजपाने जेव्हा जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवलं, तेव्हा काँग्रेससह सर्वांनी विरोध केला. ही लोकशाहीची हत्या असल्याची भाषा वापरली. विरोधकांच्या या कर्माच्या शिक्षा देश त्यांना देईल. पण पहिली संधी महाराष्ट्राला मिळाली असून, ती सोडू नका,” असं आवाहन मोदी यांनी केलं.