Manoj Jarange Patil : “विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षासाठी कागदपत्र काढण्यासाठी तहसील कार्यालयात जावे लागते. उत्पन्नाचा दाखला किंवा महत्त्वाचे कागदपत्र काढण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांचा संपही सुरू आहे. अशात आता सरकारने लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजना आणली. यात सरकारचे दोन डाव दिसतात. एक म्हणजे या योजनेतून मतदान विकत घेण्याचा प्रकार होत आहे आणि दुसरे म्हणजे निवडणूक झाल्यानंतर योजना गुंडाळून टाकायची. आशा कितीतरी योजना आल्या आणि गेल्या”, अशी टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आंतरवाली सराटी येथे आजपासून त्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची सुरूवात केली आहे. याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला आहे. सगेसोयऱ्यांच्या वचनाची पूर्ती करा आणि मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. आता ते आणखी १७ दिवस उपोषण करणार असून त्यानंतर राज्यव्यापी दौरा करणार आहेत. माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले, मी सरकारच्या योजनांचा विरोध करत नाही. पण सरकारने या योजना मधेच आणल्यामुळे विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळण्यात आता अडचणी येत आहेत. सरकारच्या संकेतस्थळावरही लोड आला असून तिथूनही कागदपत्रे डाऊनलोड करण्यात अडचणी येत आहेत.

हे ही वाचा >> विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार? शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनकेंचं मोठं विधान

आता लाडक्या मेव्हणीची तयारी करा

लाडकी बहीण योजनेवर टीका करत असताना मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत माजी खासदाराचे उदाहरण दिले. कुणाचेही नाव न घेता त्यांनी एका महिला खासदाराचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, मागे एकदा एक महिला खासदार निवडणुकीच्या प्रचारात पिछाडीवर होती. त्यांच्या विरोधात माजी खासदार उभे होते. तेही मातब्बर होते. यामुळे महिला खासदाराने संपूर्ण जिल्ह्यात साडी आणि मंगळसूत्राचे वाटप केले. यामुळे महिला आणि पुरुष मतदारांमध्ये विभागणी झाली. महिलांनी महिला उमेदवाराच्या पाठी ताकद लावल्यामुळे घराघरात कलह निर्माण झाले होते. याप्रकारे आता लाडकी बहीण, लाडका भाऊ योजनेतून तीच तयारी सुरू आहे. मराठा, ओबीसी, धनगर बांधवांना आपापसात लढवून यांची लाडकी योजना सुरू आहे. कदाचित ते लाडकी मेव्हणी योजनाही आणतील.

हे ही वाचा >> IAS Puja Khedkar : फोटो बदलला, स्वाक्षरी, ईमेल, मोबाईल आणि आई-वडीलांचं नाव बदलून दिली परीक्षा; पूजा खेडकर यांच्यावर गंभीर आरोप

“या योजनांमुळे लोक रांगेत लागले आहेत. ते रांगेत उभे राहूनच आनंदी आहेत. तेवढ्यात आचारसंहिता लागू होईल. एकदा निवडणूक झाली की, मग योजना बंद होईल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Manoj jarange accuses the government ladki bahin yojana is a plot to buy votes kvg