Manoj Jarange Patil on Maratha Reservation: राज्यातील मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा झाला आहे. अशात ओबीसी आरक्षणातून सगे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केली आहे. तसंच अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि बजरंग सोनावणे (Bajrang Sonavane) विधीमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. संसदेतही हा मुद्दा चर्चिला गेला. जातनिहाय जनगणना व्हावी आणि कुठल्याही समाजाचं आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं अशी मागणी खासदार अमोल कोल्हेंनी केली होती. मनोज जरांगे बजरंग सोनावणे आणि अमोल कोल्हेंवर संतापले (Manoj Jarange Angry on Amol Kolhe and Bajrang Sonavane) मनोज जरांगे यांनी या प्रकरणी बजरंग सोनावणे आणि अमोल कोल्हे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. काही तृप्त आत्मे आपल्यात आहेत जे अभ्यासक आहेत, समन्वयक आहेत. या लोकांना समाजासाठी मी जे काम करतो आहे आहे ते बघवत नाही, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. संसदेत खासदार अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंनी जी भूमिका घेतली त्यावरुन मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला आहे. काय म्हणाले मनोज जरांगे (What Manoj Jarange Said?) "मराठ्यांची मतं घेईपर्यंत गोड बोलायचं, मतं घेतली की जात जागी होते यांची. आमच्या मराठ्यांना हेच कळलं नाही. आता मात्र मराठ्यांचे डोळे उघडले आहेत असं म्हणत मनोज जरांगेंनी अमोल कोल्हेंना टोला लगावला आहे. तसंच एखाद्याला मराठ्यांनी खासदार केलं, मग तो बदलला. पाच वर्षांसाठी त्याला वाटत असेल की आता मला काही धोका नाही. पण आमदारकीला त्यांच्या जिवावार कोणीतरी उभं करतीलच, त्याला मराठे पाडतील असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. मनोज जरांगेंनी नाव न घेता बजरंग सोनावणेंवर ही टीका केली आहे." मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आहे. मनोज जरांगेंनी जून महिन्यात बेमुदत उपोषणही सुरु केलं होतं. शंभूराज देसाईंनी त्यांची भेट घेतली. ज्यानंतर मनोज जरांगेंनी त्यांचं बेमुदत उपोषण मागे घेतलं. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र सरकारला १३ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. सगे-सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसह मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही मुदत देण्यात आली आहे. तसंच मागच्या शुक्रवारपासून त्यांनी शांतता मोर्चेही सुरु केले आहेत. अशात आता मनोज जरांगेंनी अमोल कोल्हे आणि बजरंग सोनावणेंवर टीका केली आहे.