राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाबत केलेल्या विधानवरून, वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत आहे. तर, अनेक ठिकाणी हिंदुत्वादी संघटना, भाजपा कार्यकर्ते आंदोलन करताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवरच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाडांच्या या विधानावर टीका करता, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“जितेंद्र आव्हाड हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि हिंदू देव, देवता यांच्याविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाडांच्या तोंडून हे सगळं बोलत असतील. असं मला वाटतं आहे.”

“जितेंद्र आव्हाडांना कदाचित हे माहीत नाही, की छत्रपती शिवाजी महाराज नसते तर हा जितुद्दीन झाला असता. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अजितचा अझरुद्दीन झाला असता, शरदचा शमशुद्दीन झाला असता, रोहितचा रज्जाक झाला असता. परंतु मतांच्या राजकारणासाठी घाणेरडं विधान करणं, घाणेरडं राजकारण करणं ही पवारांची मागील ५० वर्षांतील कूट नीती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या हिंदू लोकांनी हे सगळे विषय समजून घेतले पाहिजेत. मतांसाठी किती खालच्या पातळीवर जावं, हे पवारांकडून कशापद्धतीने मतासाठी राजकारण केलं जातय हे महाराष्ट्रातील लोकांनी बघितलेलं आहे आणि आजही बघत आहेत, निश्चितपणे लोक त्यांना योग्य उत्तर देतील.”

जितेंद्र आव्हाड यांच्या ट्वीटमध्ये काय आहे? –

जितेंद्र आव्हाड यांनी आवाज बहुजनांचा सन्मान महाराष्ट्राचा असा हॅशटॅग देत चार ओळींचे एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी प्रभु राम, रावण, छत्रपती शिवाजी महाराज, मुघल, आदिलशाही अशा सर्वांचा उल्लेख केला आहे. “रावण काढून रामायणातून श्रीराम समजावून सांगा. दुर्योधन, कर्ण काढून महाभारतातून कृष्ण-अर्जुन समजावून सांगा. आदिलशाही आणि मुघल बाजूला काढून श्री शिवाजी छत्रपतींचा इतिहास समजावून सांगा. इंग्रजांना बाजुला काढून भारतीय स्वातंत्र्यलढा समजावून सांगा,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maybe sharad pawar is saying all this through the mouth of jitendra awhad gopichand padalkar msr
First published on: 06-02-2023 at 12:56 IST