महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंब्रा डोंगरावर असलेला अनधिकृत दर्गा आणि मशिदीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणातल्या धमकीचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर ठाण्यातील महाराष्ट्र सैनिक आक्रमक झाले असुन या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञातां विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात राज्यभरातील अनधिकृत मशिद, मजार आणि दर्ग्याची उभारणीकडे सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर सरकारने तत्परतेने माहिम आणि सांगलीतील मजारवर तातडीने कारवाई करून उद्ध्वस्त केले होते. तर दुसऱ्याच दिवशी मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मुंब्रा येथील डोंगरात वन खात्याच्या अखत्यारीत असलेल्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याचा प्रकार उघडकीस आणून प्रशासनाला १५ दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम दिला होता. याचे पडसाद उमटताच जिल्हा प्रशासन व वनविभागाने मुंब्रा डोंगरावर पाहणी करून चौकशी सुरु केली असतानाच काहींनी याविरोधात एकवटण्यास सुरुवात केली.

अविनाश जाधव यांच्यासंदर्भात काय व्हिडीओ व्हायरल होतो आहे?

अविनाश जाधव यांनी मुंब्रा अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर ” हम उसे जिंदा नही छोडेंगे … कोई गुस्ताख छुप न पाएगा … हम उसे ढुंड ढुंढ के मारेंगे … ” अशा आशयाचा व्हीडीओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. एस आर कमिटी … बॉयकॉट अविनाश जाधव अशा आशयाच्या या व्हिडीओतील धमकी देणारी व्यक्ती दिसत नाही. अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या धमकीनंतर महाराष्ट्र सैनिक संतप्त झाले असून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mns leader avinash jadhav death threat call what is the case scj
First published on: 26-03-2023 at 10:49 IST