रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात चक्क पैशासाठी आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलग्याला आईने विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकारांनतर सर्वत्र संतप्त भावना व्यक्त करण्यात येत आहेत. याप्रकरणी दापोली पोलिसांकडून त्या मुलाच्या आईसह एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ही घटना २६ जून २०२५ रोजी दुपारी १२.३० वाजता गुहागर एस.टी. स्टँड परिसरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोपी अरबिना सुफियान पांजरी (वय २४) रा. हर्णे, बाजारमोहल्ला हिने आपल्या ५ वर्षांचा मुलगा अरहान सुफियान पांजरी यास पैशासाठी सत्यवान दत्ताराम पालशेतकर (वय ५२) रा. बोऱ्या कारुळ, ता. गुहागर, जि. रत्नागिरी याला विकले. मात्र या प्रकरणाची गंभीर दखल घेत दापोली पोलिसांनी दोघांविरुद्ध ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५’ अंतर्गत गुन्हा दाखल करत त्या दोघांना अटक केले. याप्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरेमठ करीत आहेत