Nitin Gadkari On Balasaheb Thackeray Latest News : भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे वेगवेगळ्या कारणांसाठी नेहमी चर्चेत असतात. नुकतेच गडकरी यांनी एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलची एक मजेशीर आठवण सांगितली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कडक शिस्तीत वाढलेल्या नितीन गडकरींना या मुलाखतीमध्ये नॉनव्हेज खाण्याबद्दल आणि मद्य घेण्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना नितीन गडकरी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची एक खास आठवण सांगितली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही नॉनव्हेज का खात नाही? या प्रश्नावर गडकरी म्हणाले की, “माझ्या आईचे लहानपणापासून संस्कार होते. मी दारूही पित नाही आणि नॉनव्हेजही खात नाही. पण माझ्याबरोबर बसून कोणी नॉनव्हेज खात असेल तर मला काही अडचण नाही”.

नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले?

ि

बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी कधी तुम्हाला एकदा घेऊन पाहा असा आग्रह केला नाही का? असा प्रश्न गडकरी यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना गडकरींनी सांगितलं की, “मी एकदा रात्री बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा नाशिकच्या सुला वाइनचे चौगुले तिथे बसलेले होते. त्यांनी स्पेशल वाइन आणली होती. बाळासाहेब ती ग्लासात ओतून तुम्ही घ्या म्हणाले, तर मी त्यांना घेत नाही असं सांगितलं. यावर त्यांनी का? असं विचारलं, यावर याआधी मी कधी घेतली नाही असं उत्तर देत मी लिंबू सरबत घेईन असं म्हणालो”

पुढे हसून बोलताना गडकरी यांनी सांगितलं की, “यावर बाळासाहेब चौगुलेंना म्हणाले की, “चौगुले, हा नितीन गडकरी चड्डीछाप आहे, हा पित नाही. याच्यासाठी गायीचे शेण आणि गोमुत्रापासून तुमची वाईन बनवा तेव्हाच हा पिईल”. आपण कधीच मद्य घेतले नाही असे सांगत गडकरी म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांची बोलण्याची वेगळी पद्धत होती आणि त्याचं खूप प्रेम होतं.

“माझ्या सारख्या निरूपयोगी कच्च्या मालाला आकार देऊन जे काही बनवलं, त्याचं सगळं श्रेय विद्यार्थी परिषद आणि संघाला जातं. मी पहिल्यापासून खूप सर्वसाधारण माणूस आहे. माझ्याकडे कुठलंच टॅलेंट नाही”, असंही गडकरी यावेळी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitin gadkari told story about balasaheb thackeray and and about avoiding alcohol and non vegetarian food marathi news rak