सातारा : पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र हे ब्रिटिशकालीन आहे. या केंद्राच्या बळकटीकरणासाठी व सोयी सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे काम सर्वोत्कृष्ट आहे. या संशोधन केंद्राकडून विकसित ऊस वाण संपूर्ण देशात प्रसारित केले आहेत. या केंद्राचे बळकटीकरण करून जागतिक दर्जाचे केंद्र आपण बनविणार आहे, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली.

पाडेगाव (ता. खंडाळा) व संशोधन केंद्राला कोकाटे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुणे येथील महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे महासंचालक रावसाहेब बागडे, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, राहुरी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संचालक डॉ. साताप्पा खरबडे, मध्यवर्ती व संशोधन केंद्राचे ऊस विशेष तज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांच्यासह ऊस संशोधन केंद्रातील अधिकारी उपस्थित होते.

कोकाटे म्हणाले की, या ऊस संशोधन केंद्राने संशोधन करून नवनवीन उसाचे वाण विकसित केले आहे. या वाणामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन झाले आहे. या संशोधन केंद्राचे देशात अत्यंत चांगले काम आहे. या केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा आराखडा शंभर वर्षांचा विचार करून तयार करावा. यामध्ये शेतकऱ्यांसाठी निवासी प्रशिक्षण सभागृह, निवासाची सोय, अत्याधुनिक प्रयोगशाळा यासह विविध सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात. या कामासाठी निधीची अडचण वाचून देणार नाही. पाडेगाव येथे १९३२ साली ऊस संशोधन केंद्र स्थापन करण्यात आले. ऊस संशोधन कार्यात सुसूत्रता आणण्यासाठी देशभरात १७ संशोधन केंद्र स्थापन करण्यात आली. त्यापैकी हे एक प्रमुख केंद्र असून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या अंतर्गत काम करते, असे कोकाटे यांनी सांगितले

ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती

कृषी विभागाच्या योजना, विविध बियाणे, खते यांची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करून शेतकऱ्यांना माहिती दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना सोपी व सहज शेती करण्यासाठी मार्गदर्शनाबरोबर सहकार्य शासनामार्फत उपलब्ध करणार असल्याचे कोकाटे यांनी या वेळी सांगितले.