देशात एकीकडे करोनाच संसर्ग वाढलेला असताना दुसरीकडे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या महत्वाचा आहे. कारण, आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल काय लागणार याची सर्वांना उत्सुकता आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातही पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक निकालामुळे जोरदार चर्चा सुरू आहे. या ठिकाणी भाजपाचे समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीचे भगीरथ भालके यांच्यात थेट लढत झाल्याचे दिसून आले. यामध्ये भाजपाने बाजी मारल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कारण, समाधान आवताडे यांनी ४ हजारांपेक्षा अधिक मतांनी घेतलेली विजयी आघाडी कायम ठेवली असून, मतमोजणी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार नितेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“पंढरपूर पोट निवडणुकीमधे महाविकास आघाडीचे मंत्री आणि उपमुख्यमंत्री पर्यंत सगळे गल्ली गल्ली फिरले..तरीही लोकानी नाकारले..महाविकासआघाडी मधल्या आमदारांना हा संदेश आहे..येणारा धोका समजा आणि एक पाऊल पुढे टाका.. भाजपा हा एकच पर्याय आहे..महाराष्ट्राची जनता आमच्या बरोबर आहे!!” असं नितेश राणे ट्विटद्वारे म्हणाले आहेत.

या अगोदर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी देखील या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

“साम, दाम, दंड, भेद, सगळं करूनही पंढरपूरात महाविकासआघाडीला जनतेने नाकारलं”

”महाविकास आघाडीची पूर्ण ताकद उपमुख्यमंत्री अजित पवार ठाणं मांडून बसलेले, टप्प्यात आल की गेम करण्याची भाषा करणारे जयंत पाटील यांचे दौरे, नाना पटोले यांची सभा प्रशासनाचा फौजफाटा साम, दाम, दंड, भेद, सगळ करूनही जनतेने नाकारले. पंढरपूरात भाजपाचा आमदार हा राज्य सरकारविरोधातील जनतेचा कौलच” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pandharpur by election nitesh ranes target on maha vikas aghadi said msr
First published on: 02-05-2021 at 17:18 IST