"…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत", बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या… | Pankaja Munde first reaction over controversy on statement about PM Narendra Modi | Loksatta

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्यावर पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली.

“…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, बीडमधील वक्तव्यावर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
पंकजा मुंडे व नरेंद्र मोदी

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, असं मत व्यक्त केलं.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलनमधील माझ्या भाषणाच्या ‘हायलाईट्स’. आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. ‘सनसनीखेज’ बातम्यांतून जमले, तर हेही पहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या लिंकवर आहेच. धन्यवाद.”

सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

“मोदी मला संपवू शकत नाहीत असा पंकजा मुंडेंच्या म्हणण्याचा अर्थ नव्हताच. मोदींनी वंशवाद संपवण्याचा निर्णय घेतला आहे, पण मी जर जनतेच्या ह्रदयाचं प्रतिक असेन तर निश्चितच या वंशवादात बसणार नाही असं त्यांनी सांगितलं आहे,” असं सांगत मुनगंटीवार यांनी पंकजा मुंडेंच्या वक्तव्याची पाठराखण केली.

पुढे ते म्हणाले “अनेकदा असं होतं की, पात्रता नसताना मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून एका पदावर जातो. एखाद्या राष्ट्रीय अध्यक्षाचा मुलगा म्हणून पात्र नसतानाही त्या पदावर जाण्याचा प्रयत्न करतो. नेमका हाच भाव असावा असं मला वाटतं”. यासंबंधीच अधिक स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांच्याकडूनच घेतलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं.

“पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…”

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे. त्या मोदींना आव्हान देऊ शकत नाही. त्यांच्या विधानाचा अर्थही तसा घेऊ नये, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे म्हणाले की, मी अनेक वर्षापासून प्रामाणिकपणे पक्षाचं काम केलं असेल, तर मला कुणीही पराभूत करू शकत नाही, ही त्यांची भावना असेल, त्यांनी मोंदीचं नाव नेमक्या कोणत्या अर्थाने घेतलं, हे कदाचित मला सांगता येणार नाही. पण यातून मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर हे दुर्दैवी आहे.

हेही वाचा : “…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत”, पंकजा मुंडेंच्या बीडमधील वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

मला वाटतं त्या मोदींना आव्हानही देऊ शकत नाही आणि त्यांच्या विधानाचा तसा अर्थही घेऊ नये. कारण त्या पार्टीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या आहेत. त्यांनी अनेकदा मोदींबाबत किंवा पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत नाराजी व्यक्ती केली आहे. तरीही त्या केंद्रीय नेत्यांचं नेतृत्व मान्य करून आपल्या पक्षासाठी काम करत आहेत, असंही एकनाथ खडसे म्हणाले.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या होत्या?

पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, “आपण आगामी निवडणुका लढताना काही बदल करुयात. ही निवडणूक पारंपरिक पद्धतीने न लढता वेगळ्या विषयावर निवडणूक लढू. जात-पात, पैसा-अडका, प्रभाव यापलीकडे जाऊयात. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वंशवादाचं राजकारण संपवायचं आहे. मीदेखील वंशवादाचं प्रतीक आहे, पण मला कुणीही संपवू शकत नाही. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते संपवू शकत नाहीत.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…

संबंधित बातम्या

हैद्राबादच्या निजामाच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई
गोपीनाथ मुंडेंविषयी सुषमा अंधारेंचे मोठे विधान, नितीन गडकरींचे नाव घेत म्हणाल्या…
संजय राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “…तर सरकारला अमित शाहादेखील वाचवू शकणार नाहीत”
VIDEO: सुषमा अंधारेंच्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ टीकेला राजू पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले ‘कर भाषण आणि…’
“आमच्याकडे एक ‘सुशी ताई’ आहेत ज्यांच्या…”, मनसे आमदार राजू पाटलांची सुषमा अंधारेंवर बोचरी टीका

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“ओंकारने आधीच सांगितलं असतं तर…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक स्पष्टच बोलले
FIFA WC 2022: दिग्गज मॅराडोनाचा मेस्सीने मोडला विक्रम! ऑस्ट्रेलियावर मात करत अर्जेंटिना पोहचली क्वार्टर फायनलमध्ये
IND vs BAN 1st ODI: नाणेफेक जिंकून बांगलादेशचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
“मी शिवभक्त म्हणूनच सांगतोय…; राज्यपाल हटवण्याची मागणी करणाऱ्या आंदोलकांना सहकारमंत्री अतुल सावेंचं आश्वासन
विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?