बीड : आपल्या जन्मदात्या आईलाच मुलाने डोक्यात दगड घालत संपवण्याची घटना परळी तालुक्यात घडली आहे.राहते घर नावावर करून देण्यासाठी मुलाने हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे.सुनंदा ज्ञानोबा कांगणे असे मृत पावलेल्या आईचे नाव आहे.परळी तालुक्यातील भोजनकवाडीत ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
परळी तालुक्यातील भोजनाकवाडीत पोटच्या मुलानेच राहत्या घरासाठी आईचा जीव घेतल्याची घटना रविवार दि.२० रोजी रात्री ९.३० वा.घडली.गेल्या काही दिवसापासून आरोपी चंद्रकांत ज्ञानोबा कांगणे हा त्याच्या आईच्या नावावर असलेले घर त्याच्या नावे करण्यासाठी मागे लागलेला होता मात्र आईने नकार दिल्याने मुलाने कुरुंदाचा दगड डोक्यात घालत आपल्या जन्मदात्या आईची हत्या केली.या प्रकरणी आरोपी चंद्रकांत कांगणे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणाचा अधिकचा तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.